कॉंग्रेस नेत्या पाचशे रुपये घेऊन करतात ट्विट ! तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी केली पोलखोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Sep-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : दिल्ली भाजप प्रवक्ते तजिंदर पाल सिंह बग्गा यांनी रिया या कॉंग्रेसच्या दक्षिण मुंबईतील सोशल मीडिया एक्टीविस्ट, एआईपीसी (All India Professionals’ Congress) फेलोशिप मेंबर आणि कॉंग्रेस नेत्या एन्ड़्रीया डिझुजा यांना ट्रोल केले आहे. बग्गा यांनी व्हॉट्अपद्वारे एक मेसेज करत प्रमोशनल ट्विट करण्यास सांगितले होते. रिया यांनीही तसे करण्यास संमती दर्शवली. बग्गा यांनी प्रत्येक ट्विटसाठी पाचशे रुपये देण्याचे मंजूर केले. यासाठी त्या तयारही झाल्या आणि ट्विटही केले.



 

 

बग्गा यांनी २४ सप्टेंबर रोजी सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट सेलबद्दल ट्विट करण्यास सांगितले होते. '२४ सप्टेंबर हा फ्लिपकार्टचा वर्धापन दिन आहे.' त्यानिमित्त एक सेल सुरू केला जाणार असल्याच्या आशयाचे हे ट्विट होते. मात्र, २४ सप्टेंबर रोजी तसे काहीच नसल्याचा खुलासा बग्गा यांनी केला. दरम्यान २४ सप्टेंबर रोजी बग्गा यांचा वाढदिवस आहे. रिया यांनी ट्विट केल्यानंतर बग्गा यांनी हा खुलासा केल्यानंतर त्या ट्रोल झाल्या. कॉंग्रेसची आजची स्थिती काय आहे, हे यावरून दिसून येते, असा टोलाही त्यांनी रिया यांना लगावला. रिया यांच्या ट्विट आणि संभाषणाचे फोटो मात्र, ट्विटरवर चांगलेच व्हायरल झाले आहेत. #500LeRiaHai हा हॅशटॅगही ट्रेंड झाला.

 

या प्रकारानंतर रिया यांनी हे ट्विट डिलीट केले. पाचशे रुपए घेऊन हे ट्विट केल्याबद्दल सोशल मीडियावर नेटीझन्सने त्यांची खिल्ली उडवली. दरम्यान भाजपच्या विविध नेत्यांना ट्रोल करण्यासाठी किती रुपये मिळतात, असा सवालही सिनेनिर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान या प्रकारानंतर बग्गा यांचे अनेकांनी आभार मानले. आपल्या ट्विटरद्वारे लोकांची दिशाभूल करणाऱ्यांची अशी पोलखोल केल्याबद्दल धन्यवाद, असे नीरज श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@