अमिताभ बच्चन म्हणतात मेट्रो हवीच...!

17 Sep 2019 11:46:19


'मेट्रोचा विकास' आणि 'आरेचे जंगल वाचवा' हे मुद्दे अग्रणीवर असताना देशातील प्रत्येक स्तरातून याविषयीची मते मांडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांनी देखील आपले मत व्यक्त करत मेट्रोला पसंती दर्शवली आहे. "मित्राला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करायचे असताना मेट्रोचा वापर केला आणि खूप भारावून गेलो" असा अनुभव त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसोबत शेअर केला. एवढेच नाही तर मेट्रोचा प्रवास वेगवान, सोयीस्कर आणि सर्वात कार्यक्षम आहे असे म्हणत त्यांनी मेट्रोचे कौतुक केले.

मेट्रोच्या बांधणीत अनेक झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे त्यामुळे मेट्रोचा विकास होऊ नये असे काही पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यांच्या या चिंतेला अमिताभ बच्चन यांनी उपाय देखील सुचवला आहे. आपण आपल्या घरच्या बगिच्यामध्ये झाडे लावून, जास्तीत जास्त ठिकाणी झाडे लावून हा यक्ष प्रश्न सोडवू शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले.

गेल्या कित्येक दिवस चर्चेचा विषय बनलेल्या आरे च्या मुद्द्यावर अखेर अमिताभ बच्चन यांनी का रे विकासाला आडकाठी घालताय असा प्रश्न अप्रत्यक्षरीत्या उपस्थित केला.

Powered By Sangraha 9.0