यांच्या पितरांचे वाईट झाले...

    दिनांक  17-Sep-2019 21:33:47   काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचे त्या महात्म्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
‘कमळवाले’ कामाला लागले. मात्र, हे पाहून यांना वेड लागले आहे. काही लोक धर्मासाठी साधुसंत होतात, तर काही धर्माविरुद्ध द्वेषाने विदूषक होतात. यांना साधुसंत होणे जमले नाही, त्यामुळे ते विदूषकच झाले.


पुन्हा एकदा आपल्या मालकांना खूश करण्यासाठी दिग्गीराजाने वक्तव्य केले की
, “भगवे वस्त्र घालून बलात्कार होत आहेत आणि मंदिरांमध्येही बलात्कार होत आहेत.” हे विधान करणार्‍या या गुलामाचे पूर्वज हिंदूंच होते का? होय, प्रथम दर्शनी ऐतिहासिक पुराव्यांनुसार त्यांचे पूर्वज हिंदूच होते. यांच्या पूर्वजांना ‘हिंदू’ म्हणून जन्मल्याचे, मंदिरांचे आणि भगव्या वस्त्रांचे तसे वावडेही नसावे. तसे असते तर मग त्यांनी मुघल काळात ‘सिंग’ऐवजी ‘खान’ वगैरे नाव लावून घेतले असते किंवा १९४७ साली फाळणी झाली, त्यावेळी यांच्या पूर्वजांनी ‘नको हा हिंदू धर्म, मंदिर आणि भगवे वस्त्र’ म्हणत पाकिस्तानात पलायन केले असते. पण नाही, तसे काही दिसत नाही. याचाच अर्थ या गुलामांचे पूर्वज हिंदूच होते. मग याचे असे का व्हावे, हा मुद्दा येतो. सध्या हिंदू श्रद्धेनुसार पितृपक्ष सुरू आहे. आहेत. जरा श्रद्धाशील होऊन विचार करूया की, यांचे पितरंही खाली आले आहेत. त्या पितरांनी यांचे चाळे आणि मूर्खयुक्त वाचाळता पाहिली तर ते नक्कीच म्हणतील की, यासाठीच का जन्मलास तू? असो, हा कल्पनाविलास असला तरी, या माणसामुळे त्यांच्या पूर्वजांचा वारंवार उद्धार संपूर्ण भारतभरातून केला जातो हे नक्की. हे त्यांना माहिती असेल का? की त्यांना बाहेर काय चालले आहे ते आता कळायचेही बंद झाले आहे? बरं आता काळ-वेळ-स्थळही ते विसरायला लागलेत. त्यांनी असाही प्रश्न केला की, आता जे ‘राष्ट्रवाद’ शिकवतात (म्हणजे भाजपचे नेते, त्यातही पंतप्रधान) त्यांनी स्वातंत्र्यासाठी काय केले? आता भाजपचे अस्तित्वात असलेले तमाम नेते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच जन्मलेे. त्यामुळे जन्माआधीच ते स्वातंत्र्यपूर्वीचा लढा कसे देणार? मग यांचा प्रश्न असतो की, संघवाले तेव्हा कुठे होते? असा हिशोब लावला तर तेव्हा या पक्षाचे नव्हे देशाचे महात्मा असलेले महात्मा गांधी म्हणाले होते की, त्यांचा पक्ष विसर्जित करा. मग तो पक्ष त्यावेळी विसर्जित झाला नाही. काँग्रेस पक्ष विसर्जित करण्याचे त्या महात्म्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘कमळवाले’ कामाला लागले. मात्र, हे पाहून यांना वेड लागले आहे. काही लोक धर्मासाठी साधुसंत होतात, तर काही धर्माविरुद्ध द्वेषाने विदूषक होतात. यांना साधुसंत होणे जमले नाही, त्यामुळे ते विदूषकच झाले. त्यांच्या पितरांचे वाईटच झाले हो...

 

काँग्रेस दरबारीचा विदूषक

माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आणि नसलेली मतीगतीही पार जळून गेली तर माणूस कसा वागेल हो? कोणी आहे का डोळ्यांसमोर? माहिती आहे ‘तेच’ तुमच्या डोळ्यांसमोर आले असतील. काय त्यांचा तो मूर्खपणा, काय त्यांचा तो लबाडपणा, काय त्यांचे ते मुस्लीम धर्माचे लांगूलचालन, काय त्यांचा तो हिंदू धर्माचा तिरस्कार. बोलण्याला शब्दच अपुरे. तर तीच व्यक्ती माझ्याही डोळ्यांसमोर आली बरं. भगवा रंग पाहिला की, त्या व्यक्तीचे लोचट रक्त थेंबाथेंबाने उसळते. (थेंबथेंबच म्हणायला हवे. कारण, दिल्ली दरबारीची वारी आणि लाचारी करून त्यांचे रक्त पार गोठून गेले आहे. अगदी त्यांच्या थिजलेल्या विचारांसारखेच! पूर्वी मानवी मूल्यांविरोधात कारवाया करणार्‍यांना थांबवण्यासाठी देवीरूपी स्त्रीशक्ती अवतार घ्यायची म्हणे. यांच्याही राशीला स्त्रीशक्तीने पिडलेले. भगवी वस्त्र धारण केलेल्या आणि ‘साध्वी’ उपाधी लावलेल्या दोन स्त्रियांनी यांच्याही राजसत्तेचे तीन-तेरा वाजवलेले. म्हणूनच साध्वी, त्यांच्या अनुषंगाने येणार धर्म, मंदिर आणि भगवे कपडे यांची त्यांना भयंकर अ‍ॅलर्जी. त्यांनीही एका साधूला मागे हाताशी धरलेले. या बाबानेही यांना ‘तूच जिंकणार, तूच जिंकणार’ अशी ग्वाही दिली. मात्र, निवडणुकीत नेमके उलटे झाले. त्यामुळे तर यांना अजून भगव्याचा त्रास सुरू झाला. कारण, आपण भगवे वस्त्रधार्‍यांवर मात करूच शकत नाही, याची त्यांना प्रचिती आली. त्यांना वाटते, आपण तर राघोगडचे दिग्गज. मग भगवे कपडे घातलेले लोक आपल्या विरोधात कसे काय जिंकतात? त्यामुळे त्यांचे डोके कामातून गेले. वाटेल ते बरळत सुटले. असो, दिल्ली हायकमांडच्या इटली राणी, त्यांचे नाकर्ते राजकुमार आणि कुठेतरी शिल्लक राहिलेला त्यांचा पक्ष त्यांच्या दिग्गीजाराच्या या बरळण्यावर खूश असतील का? असतीलच. कारण, भूतकाळामध्ये राजदरबारात हे विदूषक असायचे म्हणे. आताही दिल्ली हायकमांडच्या दरबारात हे यांनी विदूषकाची नोकरी असावी वाटते. त्याशिवाय का कोणी इतके मूर्खासारखे मनोरंजन करेल. राणीला राजकुमारांना खूश करण्यासाठी मग हा विदूषक हिंदू समुदाय, त्यांची श्रद्धास्थाने यावर सारखी टीकाही करतो. तेवढेच त्याच्या मालकांना बरे वाटते.