ठरलं! "हाउडी मोदी"मध्ये ट्रम्पही येणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |



पहिल्यांदाच मोदी आणि ट्रम्प करणार भारतीय समुदायाला संबोंधन

 
 

ह्युस्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी जाहीर केल्यानुसार, २२ सप्टेंबर रोजी ह्युस्टन येथे होणाऱ्या 'हाउडी मोदी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. भारतीय समुदायाशी पहिल्यांदाच चर्चा करणार आहेत.

 
 
 
 

'हाउडी मोदी' कार्यक्रमादरम्यान सहभागी होण्यासाठी आत्तापर्यंत ५० हजारांहून अधिक जणांनी नोंदणी केली आहे. या कार्यक्रमावेळी मोदी अमेरिकेतील कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह एका बैठकीत सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते संयुक्त राष्ट्रातील महासभेत सहभागी होणार आहेत.

 

ट्रम्प यांच्या सहभागाबद्दल पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत ही माहिती दिली. ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आमच्यासोबत असतील. हा निर्णय भारत-अमेरिकेच्या संबंधांवर मजबूती दाखवत आहे. त्यातून भारतीय समुदायाचे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील योगदान दिसून येते. या कार्यक्रमात आम्ही त्यांचे शानदार स्वागत करू."

 

'हाउडी मोदी' म्हणजे काय ?

'हाउडी मोदी' या कार्यक्रमाची उत्सूकता साऱ्यांनाच आहे. सोमवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर याचा ट्रेण्ड आहे. 'हाउडी' म्हणजे 'हाऊ डू यू डू', तुम्ही कसे आहात ?. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमादरम्यान अमेरिकेतील भारतीयांशी चर्चा करणार आहेत.

 

ट्रम्प आणि मोदी द्विपक्षीय वार्ता

मोदी २१ सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर निघणार आहेत. त्यानंतर ते ह्युस्टन शहरात पोहोचतील. २३ ते २७ सप्टेंबरपर्यंत पंतप्रधान संयुक्त राष्ट्रातील महासभेत सहभाग घेतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशाचे अधिकारी यावेळी द्विपक्षीय बैठक आयोजित करण्यावर भर देणार आहेत. अमेरिकेत इतर राजकीय व्यक्तींसह मोदी यांची बैठक होणार आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@