चीनमध्ये मुस्लीमांवरील अत्याचाराबद्दल इमरान खान यांची बोलती बंद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |




इस्लामाबाद : अमेरिकेकडून मदत न मिळू शकल्याने 'आता मुस्लीमबहुल राष्ट्रांनी एकत्र या', असे आवाहन करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची एका प्रश्नावर बोलती बंद झाली आहे. मुस्लीमांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल भारताला सुनावणाऱ्या इमरान खान यांना मात्र, चीनमध्ये मुस्लीमांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल प्रश्न विचारल्यावर गप्प राहावे लागले आहे. कतर येथील अलजजिरा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत त्यांची पोलखोल झाली आहे.

मुलाखती दरम्यान पत्रकाराने त्यांना विचारले कि, "जर तुम्हाला काश्मिरप्रश्नी मुस्लीमांची चिंता सतावते तर मग चीनमध्ये मुस्लीमांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल काय? तुम्ही चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी या प्रश्नी चर्चा केली होती का ?". यावर उत्तर देताना इमरान खान म्हणाले कि, "नाही... मी काश्मीरच्या मुद्द्यावर इतका व्यस्त आहे कि, चीनमध्ये नक्की सुरू आहे, त्याबद्दल मला माहिती नाही. तो चीन आहे मला इथे लढू द्या."

@@AUTHORINFO_V1@@