पंकज अडवाणीने 'बिलियर्ड्स'मध्ये पटकावले २२ वे विश्व विजेतेपद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Sep-2019
Total Views |



नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा बिलियर्ड्स खेळाडू पंकज अडवाणीने आयबीएसएफ विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. म्यानमारच्या मंडाले येथे झालेल्या या स्पर्धेत त्याने अंतिम सामन्यात नेय थ्वाय ओलाला ६-२ ने हरवत कारकिर्दीतील २२ वे विश्व विजेतेपद नावावर केले. २०१४मध्ये व्यावसायिक स्तरावर पुनरागमन केल्यानंतर ३४ वर्षीय अडवाणीने प्रत्येक वर्षी जगज्जेतेपदाचा चषक भारतात आणला आहे.

 

बिलियर्ड्सच्या शॉर्ट फॉरमॅट प्रकारात पंकजचे हे सलग चौथे जेतेपद आहे. २०१४ नंतर झालेल्या प्रत्येक स्पर्धेत पंकजने बिलियर्ड्स, स्नुकरमध्ये विजेतेपद पटकावले आहे. २००३ मध्ये पहिले जगज्जेतेपद पटकावल्यानंतर पंकजची विजयी घोडदौड सुरूच आहे. या खेळात सर्वाधिक जगज्जेतेपद पटकावणारा तो जगातील एकमेव स्नूकरपटू ठरला आहे.

 

"खरंच हे अविश्वसनीय आहे. लागोपाठ चार वर्ष जेतेपद पटकावणे आणि मागच्या सहापैकी पाचवेळा जेतेपद जिंकणे हे माझ्यासाठी खास आहे. मी जेव्हा विश्व बिलियर्ड्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भाग घेतो तेव्हा एक गोष्ट असते की माझ्याकडे प्रेरणा खूप असते. त्यामुळे माझ्यातील जिंकण्याची भूक आणि आग अजूनही कायम आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

@@AUTHORINFO_V1@@