कोकण रेल्वेचा भीषण अपघात टळला

    दिनांक  16-Sep-2019 13:41:30


कणकवली-सिंधुदुर्ग दरम्यानची घटना


सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेच्या कणकवली-सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकादरम्यान पडवे कटींग येथे रेल्वे रूळाची पटरी तुटल्याचे ट्रॅकमनने सांगीतल्याने मांडवी एक्सप्रेस मार्गावरच थांबविण्यात आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. गस्त घालणाऱ्या ट्रॅकसेफ्टी मॅन रविंद्र तावडे याने तातडीने रेल्वे स्टेशन मास्तरांना कळविल्यानंतर कोकण रेल्वेत एकच खळबळ उडाली.