लादेन पुत्राचा खात्मा ; अमेरिकेचा दावा

15 Sep 2019 20:48:47



वॉशिंग्टन
: दहशतवादी ओसामा बिन लादेन याचा १५वा पुत्र हमजा बिन लादेन याचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकेने रविवारी केला. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा झाल्याचे वृत्त अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी दिले असून खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा याला दुजोरा दिला.


अमेरिकेने २०१७ साली जारी केलेल्या केलेल्या दहशतवाद्यांच्या काळ्या यादीत हमजा बिल लादेनचा समावेश होता
. अमेरिकेविरोधी दहशतवादी कारवाया करण्यामध्ये त्याचाही समावेश असल्याने लष्कराकडून त्याचा शोध सुरू होता. मात्र, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमेवरील दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला असल्याचे अमेरिकेच्या लष्कराचे म्हणणे आहे.

Powered By Sangraha 9.0