भगवी वस्त्र, रुद्राक्षमाळा घालून ख्रिस्त्यांचा धर्मप्रसार? हिंदूंना भ्रमित करण्याचा आरोप-वाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Sep-2019
Total Views |




कारवार
: बेळगाव डायसिसच्या बिशप डेरेक फर्नांडिस यांची भगवी वस्त्र ओढून, कपाळी टिळा लावलेली छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने आणि अन्य माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या छायाचित्रांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वाद सुरू असून डेरेक यांचा उद्देश या माध्यमातून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा आहे, असे आरोपही करण्यात येत आहेत. या छायाचित्रांमध्ये डेरेक यांच्याबरोबर इतरही काही लोक त्यांच्यासारखेच भगवे कपडे घातलेले दिसत असून काहींच्या गळ्यात रुद्राक्षाच्या माळादेखील आहेत. व्हायरल झालेल्या या छायाचित्रांतून ख्रिस्ती धर्मगुरु प्रसाद ग्रहण संस्कार करत असल्याचे दिसत आहे.


दरम्यान
, डेरेक फर्नांडिस यांना पोप फ्रान्सिस यांनी बेळगावचे सहावे बिशप म्हणून १ मे रोजी नियुक्त केले होते. परंतु, आताची त्यांची ही छायाचित्रे व्हायरल झाल्यानंतर डेरेक यांच्यावर हिंदूंना भ्रमित करून त्यांचे धर्मांतर करण्याचा आरोप करण्यात येत आहे. डेरेक यांना यावरून मोठ्या प्रमाणात टीकेला आणि विरोधाला सामोरे जावे लागत असून त्यात हिंदू व ख्रिस्त्यांचाही समावेश आहे. काही ख्रिस्ती धर्मानुयायांच्या मते बिशपची ही गतिविधी ईशनिंदेसारखी आहे.


तथापि
, बेळगाव डायसिसचे पदाधिकारी फिलिप कुट्टी याबद्दल म्हणाले की, ही छायाचित्रे दि. २९ ऑगस्ट रोजीच्या बिशपच्या दूशनूर चर्च दौर्‍यादरम्यान घेतलेली आहे. सुरुवातीला हे चर्च विरक्त मठ होते. ख्रिस्ती पाद्री तिथे सुमारे ४० वर्षांपूर्वी गेले आणि त्यांनी भगवी वस्त्र परिधान करण्याच्या परंपरा स्वीकारल्या. इतकेच नव्हे, तर त्यांनी तिथे जो तंबू तयार केला. त्यालाही शिवलिंगाचा आकार दिला. डायसिसचे अन्य एक पाद्री फादर नेल्सन पिंटो यांच्या मतानुसार, सुरुवातीला पाद्री दूशनूरला आले तेव्हा त्यांनी स्थानिकांच्या संस्कृतीचा स्वीकार केला. त्या परिसरात प्रामुख्याने लिंगायत समुदायाचे लोक राहत असत आणि त्याचमुळे पाद्री शाकाहारीदेखील झाले. दरम्यान, त्यांनी असेही सांगितले की, पाद्रींनी लोकांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न केले नाही. आर्चबिशन फिलिप नेरी फराओ यांनीही असे सांगितले की, डेरेक फर्नांडिस यांनी घातलेली वस्त्रे स्थानिक परंपरांच्या स्वीकारातून आलेली आहेत.


छायाचित्रे पोस्ट करणार्‍याला धमक्या

दरम्यान
, एका बाजूला छायाचित्रांवरून उद्भवलेल्या वादावर चर्च स्पष्टीकरणे देत आहे तर ही छायाचित्रे पोस्ट करणार्‍या सेवियो रॉड्रिग्ज यांना धमक्याही दिल्या गेल्या. बिशपची ही छायाचित्रे ट्विट करण्यावरून रॉड्रिग्ज यांना एका ट्विटर वापरकर्त्याने तोंड काळे करण्याची, चपलांचा हार घालण्याची आणि असे करणार्‍याला ५० हजारांचे बक्षिस देण्याची घोषणा केली. अन्य एका वापरकर्त्याने सेवियो यांचे नाव घेत, तुम्ही जे कोणीही असाल, पण आमच्या धर्माविरोधात काहीही बोलू नका, तुम्हाला आमच्या धर्माविरोधात बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असेही म्हटले.

@@AUTHORINFO_V1@@