मिशन मंगलची २०० कोटींची घोडदौड

13 Sep 2019 11:14:11


अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, शर्मन जोशी, निथ्या मेनन, विक्रम गोखले, दलिप ताहिल यांच्यासारखी जबरदस्त स्टारकास्ट घेऊन 'मिशन मंगल' चित्रपटाचे यान देशभर प्रक्षेपित झाले. आणि आज या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २०० कोटींची घोडदौड केली. या पार्श्वभूमीवर 'मिशन मंगल' २०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला.

'मिशन मंगल' ने आत्तापर्यंत २००.१६ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसच्या यादीत तिसरे स्थान मिळवले आहे. पहिल्या स्थानावर ३४२.५३ कोटींची कमाई असलेला 'संजू' आहे, दुसऱ्या स्थानावर २१०.१६ कोटींची कमाई असलेला 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट आहे आणि आता 'एक था टायगर या चित्रपटाला मागे टाकत 'मिशन मंगल' ने तिसरी जागा पटकावली आहे.

जगन शक्ती यांचा 'मिशन मंगल' हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. त्यामुळे पहिल्याच चित्रपटाला इतके भरभरून यश मिळाल्याने प्रेक्षकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. दरम्यान त्यांनी 'इक्का' या आगामी चित्रपटाची घोषणा देखील केली आहे त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आता उंचावणार आहेत हे नक्की.

Powered By Sangraha 9.0