५० हजार १५३ रुपयांमध्ये मिळणार नवा 'अॅपल ११'

    दिनांक  11-Sep-2019 14:24:49
 जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी, अशी ओळख असलेल्या 'अॅपल'ने तीन नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. 'iPhone 11', 'iPhone 11 Pro', 'iPhone 11 pro Max', या नव्या उत्पादनांची घोषणा अॅपलने मंगळवारी केली. त्यापैकी 'iPhone 11' मध्ये ड्युअल सेट अप कॅमेरा मिळणार आहे.

 
  


'iPhone 11 Pro', 'iPhone 11 pro Max', उत्पादनांमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. भारतात यापूर्वी लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी नोट '10 प्लस' आणि 'एस 10'शी या उत्पादनांशी अॅपलची स्पर्धा असणार आहे. 'आयफोन ११'ची किंमत ५० हजार १५३ रुपये, 'आयफोन ११ प्रो' ७१ हजार ६६३ रुपये, 'आयफोन ११ प्रो मॅक्स' ७८ हजार ८४२ रुपये, अशी या उत्पादनांची किंमत आहे. 'आयफोन ११मध्ये 'ए-१३ प्रोसेसर लेन्स' आहे. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, हा सर्वाधिक गतिमान प्रोसेसर असलेला फोन आहे. 
 
 

सर्वात जलद जीपीयू प्रणाली असलेला या फोनमध्ये रेटिना डिस्प्ले सहा विविध रंगांमध्ये उपलब्ध असेल. 'ड्युअल सेटअप' आणि 'वाईड अँगल लेन्स'द्वारे या फोनमधून '१२० डीग्री फिल्ड व्ह्यूज्' असलेले छायाचित्रण केले जाऊ शकते. दोन्ही कॅमेरे १२ मेगापिक्सल असणार आहेत. आयफोन ११ नाईट मोडवरही कार्यरत राहू शकतो. या द्वारे कमी प्रकाशातही फोटो काढले जाऊ शकतात. प्रति सेकंद ६० फ्रेमच्या वेगाने यात 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकते.
 

 

'आयफोन ११ प्रो' आणि 'प्रो मॅक्स'मध्ये 'ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप' देण्यात आला आहे. 'आयफोन ११ प्रो'मध्ये ५.८ इंच स्क्रीन देण्यात आली आहे, तर 'आयफोन ११ प्रो'मध्ये ५.८ इंच स्क्रीन देण्यात आली आहे. प्रो मॅक्समध्ये ६.५ इंच स्क्रीन देण्यात आली आहे.
 

 
 

दोन्ही फोनमध्ये ४५८ppi स्क्रीन रिझॉल्युशन उपलब्ध आहे. या डिस्प्लेला सुपर रेटिना असे नाव देण्यात आले आहे. यात वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. एक टेलीफोटो कॅमेराही यात देण्यात आला असून प्रो सिरीजचे फोन १८ वॅट क्षमतेच्या फास्ट चार्जरसह उपलब्ध आहेत. १३ सप्टेंबरपासून यासाठी नोंदणी सुरू होणार असून ग्राहकांसाठी २० सप्टेंबर रोजी हे फोन उपलब्ध होणार आहेत.