आमिर खानवर तनुश्री दत्ताचे टीकास्त्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Sep-2019
Total Views |


संगीतातील उस्ताद गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित 'मोगूल' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी प्रचंड चर्चा रंगत होती. आमिर खान या चित्रपटाच्या निर्मिती मध्ये सहभागी असल्यामुळे ही भूमिका स्वतःच करणार असल्याचे जाहीर करण्यापूर्वी त्याने अक्षय कुमार, वरुण धवन, कपिल शर्मा अशा अनेक कलाकारांना या भूमिकेसाठी विचारले होते.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. Me Too मुव्हमेंटमुळे अनेक दिवस चर्चेत असलेल्या तनुश्री दत्ता हिने आमिर खानवर या निर्णयामुळे टीका केली आहे. आमिर खान यांचा हा सोयीस्करवाद असल्याचा आरोप तिने केला आहे. आता या आरोपावर आमिर खान काही प्रत्युत्तर देतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

'मोगूल' चे दिग्दर्शक सुभाष कपूर Me Too मुव्हमेंट मध्ये अडकल्याने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता असे आमिर ने स्पष्ट केले. मात्र आता अखेर त्याने ही भूमिका स्वीकारली आहे.

@@AUTHORINFO_V1@@