'या' काँग्रेस नेत्याने केला पक्षातील गटबाजीला विरोध

11 Sep 2019 16:25:21


 

नवी दिल्ली : प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा मंगळवारी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधीलच नेत्यांना खडेबोल सुनावले आहे. उर्मिला मातोंडकर पक्षातल्या गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले म्हणाले.

 

"काँग्रेसने जी वागणूक उर्मिला यांना दिली ती निषेधार्हच आहे. असे लोक गमावणे हे पक्षाला नुकसानकारक आहे. उर्मिलाजींनी पक्ष जरी सोडला असला तरी त्या दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाही. त्या विचारधारेशी एकनिष्ठ असून विचारधारेशी तडजोड करणार नाहीत. पक्षांतर्गत गटबाजी आहे आणि उर्मिलाजी फार राजकीय नसल्याने त्यांना हे सहन झाले नाही. त्यामुळे याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष द्यावे." असे तांबे यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0