दबंग ३ मोशन पोस्टर प्रदर्शित;आता फक्त १०० दिवसांची प्रतीक्षा

    दिनांक  11-Sep-2019 11:05:20


 

दबंग आणि दबंग २ च्या अभूतपूर्व यशानंतर दबंग ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तत्पूर्वी या दबंग चित्रपटाचे दबंग मोशन पॉटर आज प्रदर्शित करण्यात आले. दबंग चित्रपटातील एक मुख्य भूमिका साकारणाऱ्या सलमान खानचा म्हणजेच चित्रपटातील रॉबिन हूड पांडे चा रुबाब या मोशन पोस्टरमधून झळकतोय. शिवाय या चित्रपटाची भव्यतेचासुद्धा या पोस्टरवरून प्रेक्षकांना अंदाज येऊ शकतो.

प्रभू देवा हा नृत्य दिग्दर्शनाचा बादशहा तर आहेच मात्र आत्तापर्यंत दबंग, ABCD अशा चित्रपटांमधून त्याने आपले दिग्दर्शनातील कौशल्य सुद्धा सिद्ध केले आहे आणि प्रेक्षकांना वेड लावले आहे. त्यामुळे प्रेक्षक आता दबंग ३ च्या प्रतीक्षेत आहेत.

आता चित्रपटाला फक्त १०० दिवस बाकी आहेत अशी आठवण सलमान खानने मोशन पोस्टर शेअर करताना प्रेक्षकांना करून दिली आहेच. त्यामुळे २० डिसेम्बरला पुन्हा एकदा हे दबंग वादळ चित्रपटगृहांमध्ये धडकणार आहे. तेव्हा सोनाक्षी सिन्हा, सलमान खान आणि प्रभू देवा यांच्या एकत्रित जलवा पाहायला प्रेक्षक नक्कीच तयार असतील.