गुप्तचर यंत्रणांचा संयश खरा ठरला : पाकिस्तान सीमारेषेवर ७ लॉन्च पॅड आणि २७५ जिहादी तैनात

    दिनांक  11-Sep-2019 12:12:45


 


नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरची सुटका केल्यानंतर 'जैश-ए-महम्मद' ही दहशतवादी संघटना भारताविरोधात मोठा घातपात घडवून आणण्याच्या तयारीत असल्याची माहीती गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. मात्र, आता भारत-पाक सीमेवर नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे दहशतवादी तळ सुरू केल्याची खळबळजनक माहिती भारतीय गुप्तचर संस्थांच्या हाती लागली आहे.नियंत्रण रेषेनजीक ७ लॉन्च पॅड सुरू झाले आहेत. तसेच २७५ जिहादीही या ठिकाणी सक्रिय आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता भंग करण्याच्या हेतूने अफगाण आणि पश्तून शिपाईही तैनात करण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. पाकिस्तानने याआधीही अफगाण आणि पश्तून जिहादींचा दहशतवादासाठी वापर केला आहे. १९९० मध्ये पाकिस्तानने या जिहादींचा दहशतवादासाठी वापर केला होता. त्यावेळी काश्मीर खोऱ्यात प्रॉक्सी युद्ध छेडण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता.
 

पाकिस्तानी सेना आणि आयएसआय मिळून भारताविरोधात षडयंत्र रचत असल्याची माहिती एका इंग्रजी दैनिकाला मिळाली आहे. नियंत्रण रेषेजवल लाँचिंग पॅड तयार करून, दहशतवादी तळ उभारत पाकिस्तान दहशतवाद्यांना काश्मीरच्या गुरेज सेक्टरमधून भारतात घुसखोरीसाठी पाठवत आहे.