ई पुस्तकांचा खजिना असणाऱ्या 'कॅराव्हॅन'चे लोकार्पण

    दिनांक  10-Sep-2019 15:06:46मुंबई
: महाराष्ट्राचे शालेय क्रीडा
,शिक्षण व युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या कॅराव्हॅनचा लोकार्पण सोहळा आज मुंबईत पार पडला. ही व्हॅन प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना डिजिटल माध्यमातून अभ्यासक्रमाचे धडे देणार आहे. लहान मुलांसाठी डिजिटल पुस्तकांचा खजिना असणारी ही बस मुंबईतील प्रत्येक शाळेमध्ये जाणार आहे.

 


 

वांद्रे पश्चिमच्या शाळांमध्ये आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग साकारण्यात आला आहे. या बसमध्ये १३ टॅब
, १३ डिजिटल स्क्रीन टीव्ही व मुलांना माहितीपर चित्रपट दाखविण्यासाठी मोठी स्क्रिन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच शैक्षणिक व्हिडिओचा संग्रह, चार हजार ई कथांचा संग्रह, अंध विद्यार्थ्यांसाठी ध्वनिमुद्रित केलेली ई पुस्तके, पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रमाची ई पुस्तके असा संग्रहित डेटा एकाच बसमध्ये मुलांना मिळणार आहे. बहुदा संपूर्ण राज्यातीलच हा पहिलावहिला अनोखा उपक्रम आहे. या कार्यक्रमास आशिष शेलार यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या आनंदिनी ठाकूर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास नगरसेविका अलका केरकर, सपना म्हात्रे यांच्यासह स्थानिक नागरिकही उपस्थित होते.