'मन उधाण वारा' चित्रपटातून संजय मेमाणे यांचे दिग्दर्शनात पदार्पण

    दिनांक  10-Sep-2019 13:28:22


 

सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे दिग्दर्शित 'मन उधाण वारा' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. संजय मेमाणे पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आपली कलाकृती सादर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांविषयी प्रत्येकालाच उत्सुकता असेल.

विशेष म्हणजे बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत आणि त्यांचादेखील मराठी चित्रपट निर्मितीतील हा पहिलाच अनुभव आहे. मन उधाण वाराहा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.

या चित्रपटात मोनल गज्जर, रित्विज वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत.