पहिल्या दक्षिण आशियायी सीमापार तेल पाईपलाईनचे उदघाटन

    दिनांक  10-Sep-2019 13:22:10नवी दिल्ली
पहिली दक्षिण आशियायी सीमापार तेल पाईपलाईन भारत-नेपाळ दरम्यान सुरू करण्यात आली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाईपलाईनचे संयुक्तपणे उद्घाटन केले.


बिहारमधील मोतिहारी ते नेपाळमधील अमलेखगंजपर्यंत पाईपलाईनने पेट्रोलियम पदार्थ जसे डिझेल
, एलपीजी आणि विमान वाहतूक टर्बाईन इंधन हस्तांतरित केले जाईल. "या प्रकल्पाच्या एकत्रित उद्घाटनासाठी आज व्हिडिओ लिंकवर आपल्यासह सामील झाल्याने मला आनंद झाला." अशी प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
पुढे ते म्हणाले,
"मे २०१९ ला पंतप्रधान ओली यांच्या भारत भेटीदरम्यान आम्ही पूर्ण झालेले प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्यास सहमती दर्शविली. मी खुश आहे की, आमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे दोन्ही देश प्रगती करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही राजकीय पातळीवर नेपाळ भारत मैत्रीपूर्ण संबंध ठेवत दोन्ही देशांमध्ये विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. गेल्या पाच वर्षांत आम्ही अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय प्रकल्प पूर्ण केले आहेत. अनेक उपक्रमांचे चांगले निकाल लवकर आपल्याला पाहायला मिळतील. मागील वर्षी आम्ही पशुपतिनाथ धर्मशाला आणि आयसीपी वीरगंज यांचे एकत्रित उद्घाटन केले. सुमारे ४०० कोटी खर्चून ६८.९ किलोमीटरपर्यंत ही पाईपलाईन बनविण्यात आली आहे. ही पेट्रोलियम पाईपलाईन उघडल्यामुळे नेपाळ दरमहा कोट्यवधी रुपयांची बचत करेल.