रस्ते मंत्रालय वित्तीय संकटात नाहीच ! वर्षभरात आणखी ४५० मार्गांना मंजूरी

    दिनांक  10-Sep-2019 13:00:32


एनएचएआयकडे पुरेसा निधी : नितीन गडकरी


मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले कि, "पीएमओ कार्यालयाचे पत्र सोशल मीडियावर टाकणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आले. हे पत्र सोशल मीडियावर टाकल्याने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) भेडसावणाऱ्या वित्तीय संकटाबद्दल पीएमओ चिंतीत आहे, अशा अफवा पसरल्या होत्या."

गडकरी म्हणाले, "केंद्रीय वाहतूक मंत्रालयाला सल्ला देण्यासाठी एका व्यक्तीने तेराशे पानी पत्र लिहीले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र यांनी नऊ सचिवांना हे पत्र पाठवले होते. यात रस्ते मंत्रालयाचाही सहभाग होता. एनएचएआयच्या आर्थिक स्थिती आणि योजनांबद्दलच्या प्रश्नांना यात उत्तरे देण्यात आली होती. या उत्तरांच्या प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली."

मोदी, पीएम आणि एनएचएआयचाही आमच्यावर विश्वास !

गडकरी म्हणाले, 'मोदी, पीएम आणि एनएचएआयचाही आमच्यावर विश्वास कायम आहे. एनएचएआयकडे निधीची कमतरता नाही. यावर्षी आम्ही पाच लाख कोटींची रस्ते विकास योजना आखली आहे. ही पूर्ण करण्यासाठी टोल ऑपरेटर ट्रान्सफर, इंजिनिअरींग, प्रोक्योरमेंट कंस्ट्रक्शन, बिल्ट ऑपरेटर ट्रान्सफर आदींचा सहभाग आहे.

आणखी ४५० योजनांची घोषणा

गडकरीनी केलेल्या घोषणेनुसार एकूण ४५० प्रकल्प या वर्षी घोषित केले जाणार आहेत. त्यासाठी भूसंपादन, जमिन अधिग्रहण आदी संदर्भात एक तक्ता जाहीर केला जाणार आहे. त्यासाठी केंद्राकडून कोणताही अतिरिक्त निधी घेतला जाणार नसल्याचेही ते म्हणाले.