जम्मू काश्मीर हा भारताचाच भाग : पाकिस्तान परराष्ट्र मंत्री

    दिनांक  10-Sep-2019 16:35:27

जिनीव्हा :
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत काश्मीरप्रश्नी भारताची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानचीच पूर्ती कोंडी झाली. भारताने काश्मीर बाबतघेतलेल्या आक्रमक पवित्र्याने पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील कोंडी करण्यात आली. परंतु हा प्रश्न उपस्थित करत असताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी काश्मीरचा उल्लेख इंडियन स्टेट ऑफ जम्मू काश्मीर असा केला. त्यामुळे आता काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे पाकिस्तानने मान्य केले आहे.


पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी संयुक्त राष्ट्र संघात व्यासपीठावर बोलताना काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग असल्याचे म्हटले. काश्मीर संदर्भात बोलताना कुरैशी म्हणाले इंडियन स्टेट जम्मू-काश्मीर याचाच अर्थ भारतातील राज्य जम्मू-काश्मीर असा होय. कुरैशी यांच्या या वक्तव्यामुळे जे सत्य जगाने मान्य केले आहे. पण पाकिस्तान नेहमी फेटाळत होते ते देखील त्यांनी मान्य केला आहे.


चूक लक्षात आल्यानंतर केले आरोप

काश्मीर हे भारतातील राज्य असल्याचे सांगितल्यानंतर कुरैशी यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली. काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. भारताला वर्तमान सीमा बदलायच्या असल्याचा आरोप त्यांनी केला.