टाटा पॉवरच्या ग्राहकांसाठी गारेगार ऑफर

    दिनांक  10-Sep-2019 21:32:43


 

 

मुंबई : टाटा पॉवर या अग्रगण्य वीज कंपनीने ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर जाहीर केली आहे. या अंतर्गत ग्राहकांना फाईव्ह स्टार एसी एक्स्चेंज ऑफरमध्ये ५० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे. नव्याने एसी विकत घेणाऱ्यांनाही पर्याय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना या खरेदी अंतर्गत पाच वर्षांपर्यंत वॉरंटी उपलब्ध आहे. ही योजना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 'व्होल्टास'च्या एक ते दीड टन एसीवर ही सवलत उपलब्ध असणार आहे. घरगुती आणि कार्यालयीन वापरासाठी ही सेवा उपलब्ध आहे.

 

उत्पादकांच्या नियमनुसार ग्राहकांना मोफत इन्स्टलेशनही करता येणार आहे. टाटा पॉवर कायमच ऊर्जा बचत करण्यावर भर देत आहे. ग्राहकांना या सवलतीमुळे त्यांच्या मासिक बिलाच्या रकमेत बदल निश्चित जाणवेल, असा विश्वास टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक प्रावीर सिन्हा यांनी सांगितले. व्होल्टासचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप बक्षी म्हणाले की, "टाटा पॉवरशी झालेली या योजनेसाठीची भागीदारी ग्राहकांना किफायतशीर ठरणार आहे."

 

येत्या २५ वर्षांत वीजदेयकांमध्ये मोठी घट पुढील काळात टाटा पॉवर आणि 'व्होल्टास' एकत्र येत सौरऊर्जा वापराला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहेत. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर दोन्ही कंपन्यांचा भर असणार आहे. घरांच्या छतावर सौरपॅनल बसवून देणाऱ्या उत्पादनांना चालना देण्याचे काम दोन्ही कंपन्यातर्फे केले जाणार आहे.

 

मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅपला मराठी नाव

 

"टाटा पॉवरच्या ग्राहकांना देयक भरणा आणि ऑफर्सचा लाभ घेता यावा, तसेच कागदी बिलांऐवजी सर्व माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावी या हेतूने मायक्रोसॉफ्टशी करार करून ग्राहकांना 'काय झालं' (kai zala) अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे या अॅपचा शुभारंभ टाटा पॉवरच्या कॉर्पोरेट सेंटर येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान करण्यात आला. आम्ही हे अ‍ॅप ग्राहकांना सुपूर्द करताना सुरक्षा, गोपनीयतेची हमी देतो," असे आश्वासन मायक्रोसॉफ्टचे इंडियाचे प्रमुख समीक रॉय म्हणाले.