आमच्या अंतर्गत गोष्टींपासून दूर राहा : पाकला कडक शब्दात इशारा

    दिनांक  09-Aug-2019 18:09:14


 


नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधून कलम ३७० हटवल्यानंतर बावचळलेल्या पाकिस्तानला आता अमेरिकेनंतर भारतानेही कडक शब्दांत सुनावले आहे. "पाकिस्तानने आपल्या देशांतर्गत बाबींवर लक्ष केंद्रीत करावे. आत्तापर्यंत पाकिस्तानने सर्व निर्णय एकतर्फी घेतलेले आहेत. भारताने कोणत्याही प्रकारचा इशारा दिलेला नाही. मात्र, पाकिस्तान जाणीवपूर्वक तणावपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा विचार करत आहेत. कलम ३७० रद्द झाल्यामुळे पाकिस्तान चिंताग्रस्त आहे."

 

विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार पाकिस्तानवर आरोप करत म्हणाले, "भारताकडून काश्मिरमध्ये विकासाची पावले उचलल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवादाला रसद पुरवण्याचे मनसुबे कमी फोल ठरणार आहेत. भारताच्या अंतर्गत बाबींना पाकिस्तान वारंवार वादाचा मुद्दा बनवत आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री देशाला संबोधित करतानाच या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत." ३७० कलमाला पाकिस्तान ज्या प्रकारे आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवत आहे. ते खपवून घेतले जाणार नाही. यावर कठोर पाऊले उचलली जातील. पाकने समझोता एक्सप्रेस थांबवल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली.