एनसीपीएतर्फे ऑगस्ट डान्स रेसिडेन्सी च्या ९ व्या आवृत्तीचे आयोजन

    दिनांक  09-Aug-2019 12:03:28


यंदाच्या वर्षी महोत्सवात शिबिरे, सिनेमा प्रदर्शनांसोबत ममता शंकर डान्स कंपनीचे सादरीकरण


मुंबई
: यंदा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून ऑगस्ट डान्स रेसिडेन्सी या दोन दिवस चालणा-या कार्यक्रमात सिनेमा प्रदर्शन, नृत्य शिबिरे आणि साबरीया रोमहर्षक नृत्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. १० ऑगस्ट २०१९ असे दोन दिवस एनसीपीएमध्ये चालणाऱ्या या कार्यक्रमात ममता शंकर डान्स कंपनी सहभागी होणार आहे.


यावर
बोलताना एनसीपीए नृत्य कार्यक्रम प्रमुख स्वप्नोकल्पा दासगुप्ता म्हणाल्या की, “यंदा कलाविश्वात आम्ही दिलेल्या योगदानाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने आमच्यादृष्टीने ते अतिशय खास आहे. अशा या आनंदाच्या प्रसंगी हा मंच आम्ही भारताच्या आधुनिक नृत्यकलेचे संस्थापक उदय शंकर यांना समर्पित केला आहे. त्यांची सुकन्या आणि अभिनेत्री ममता शंकर आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेत कला सादर करणार आहे. त्याचप्रमाणे शंकर यांची अनोखी नृत्यशैली मांडणारी शिबिरे देखील यावेळी घेण्यात येतील. त्याशिवाय यावेळी पहिल्यांदाच एका नर्तकाच्या आयुष्यावर बेतलेल्या कल्पनाधारित सिनेमाचे प्रदर्शन देखील ठेवण्यात आले आहे. उदय शंकर यांनी बॅले प्रकारावर तयार केलेल्या सिनेमाचे नाव कल्पना असून अभिनेत्री पद्मिनी आणि उषाकिरण यांच्यासारख्या वलयांकित नावांची रेलचेल असलेली ही शंकर यांची सिनेसृष्टीतील पदार्पणाची फिल्म आहे.सर्व
नृत्य इच्छुकांकरिता ऑगस्ट रोजी उदय शंकर यांच्या नृत्यशैलीवर आधारित शिबिराचे आयोजन ममता शंकर डान्स कंपनीतर्फे करण्यात येईलतर १० ऑगस्ट रोजी एनसीपीएच्या गोदरेज डान्स थिएटरमध्ये दिग्गज नर्तक उदय शंकर यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्याकल्पनासिनेमाचे सादरीकरण होईलया महोत्सवाची सांगता अभिनव अशी ममता शंकर डान्स कंपनीच्यासाबरी!’ या नृत्य सादरीकरणाने करण्यात येईल. अभिनेत्री ममता शंकर या डान्स कंपनीच्या सर्वेसर्वा असून त्या नृत्य क्षेत्रातील दिग्गज उदय शंकर आणि सुप्रसिद्ध नर्तिका अमला शंकर यांच्या कन्या आहेतममता शंकर यांनी सत्यजित रे, म्रिणाल सेन, रितुपर्ण घोष यांच्यासारख्या सर्वोत्तम सिनेदिग्दर्शकांसोबत काम केले आहे. सत्यजित रे यांच्या आगंतुक फिल्ममधील भूमिकेसाठी ममता यांना राष्ट्रीय पुरस्कारही लाभला होता.


उदय शंकर यांची अनोखी नृत्यशैली इतरांना शिकवण्याच्या दृष्टीने १९७७ मध्ये डान्स कंपनीची स्थापना करण्यात आली. शास्त्रोक्त भारतीय नृत्यासोबतच समकालीन जाणिवांची सरमिसळ करून निराळी शैली शंकर यांनी तयार केली होती. मागील २९ वर्षांत ममता यांनी काही नृत्यनाटिका तसेच छोट्या नृत्यछटांचे दिग्दर्शन केले असून समकालीन संकल्पना मांडल्या आहेत. त्यामधील काही नमूद करण्याजोगे काम म्हणजे टागोरांचे चांडालिका”, “मदर ऑफ अर्थ”, आणि इतर. त्यांच्या नृत्यसंघाने काही दखलपात्र नृत्यदिग्दर्शनांसोबत नृत्यनाटिका आणि डान्स बॅले सादर केले आहेत.