'जबरिया जोडी' चित्रपटामध्ये ९ बदल

09 Aug 2019 14:11:22


 


परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या मुख्य भूमिका असलेला
'जबरिया जोडी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. तत्पूर्वी काल सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने चित्रपटामध्ये ९ बदल सुचवले. चित्रपटामधील काही शिव्या आणि आक्षेपार्ह शब्द बदलून त्याच्या जागी सौम्य शब्द वापरण्याच्या सूचना दिल्या. आज चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रशांत सिंह दिग्दर्शित 'जबरिया जोडी' या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्राबरोबरच अपारशक्ती खुराना, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांनीदेखील मुख्य भूमिका साकारली आहे. परिणिती आणि सिद्धार्थ याआधी 'हसी तो फसी' या चित्रपटातून एकत्र झळकले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. उत्तर भारतातील वर अपहरण प्रकारांच्या सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

असा हा हलकाफुलका वाटणारा पण गंभीर आशय मांडणारा 'जबरिया जोडी' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. या चित्रपटाला आता बॉक्स ऑफिसवर काय स्थान मिळते आणि प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Powered By Sangraha 9.0