रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार देशवासीयांना संबोधित

    दिनांक  08-Aug-2019 17:42:36नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्राला संबोधित करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेत काहीसा बदल करण्यात आला आहे. गुरुवारी ४ वाजता होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण ८ ऑगस्ट रोजी देशाला संबोधित करणार आहेत. काश्मिरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना प्रथमच संबोधित करणार आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमके काय बोलणार याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी देशाला संबोधित करणार होते. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे ही वेळ पुढे ढकलण्यात आली. दरम्यान, पंतप्रधानांच्या भाषणाविषयी विविध तर्क लावले जात असले तरीही सध्या या गोष्टी गुलदस्त्यात आहेत.

 

२७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूकांपूर्वी 'मिशन शक्ती' या उपग्रह भेदण्याच्या क्षमतेची घोषणा केली होती. त्यावेळीही नरेंद्र मोदींच्या भाषणाबद्दल काहीवेळापूर्वी घोषणा केली होती. कलम ३७० हटवल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर याबद्दल प्रतिक्रीया उमटत आहेत. लडाख केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर आता जम्मू व काश्मिरबद्दलही अशी घोषणा केली जाऊ शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.