भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पहिला एकदिवसीय सामना

    दिनांक  08-Aug-2019 13:34:04


 


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात गेल्या ३ ऑगस्टपासून मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. या आधी या मालिकेतील तीन टी ट्वेन्टी सामने भारताने आपल्या खिशात घातले असून चांगल्या फरकाने या मालिकेमध्ये वर्चस्व मिळवले आहे. त्यामुळे ही संपूर्ण मालिका जिंकण्याच्या दृष्टीने या पुढील सामने देखील महत्वाचे असतील.

आजचा सामना सुरु होण्यास फक्त ५ तास बाकी असून हा सामना प्रॉव्हिडन्स स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. संध्याकाळी ७ वाजता आजच्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात होईल.

 
आजच्या सामन्यातील भारतीय संघामध्ये कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, खालील अहमद, युझवेन्द्र चहल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केदार जाधव, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, मनीष पांडे, रिषभ पंत, के एल राहुल, नवदीप सैनी यांचा समावेश आहे.