बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस ७४ !

    दिनांक  08-Aug-2019 12:33:17मुंबई
: बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सदस्यांना सरप्राईझ मिळाले. बिग बॉसच्या घरात बऱ्याच पाहुण्यांनी हजेरी लावली. ये रे ये पावसा-२' या चित्रपटातील कलाकार मंडळी म्हणजेच संजय नार्वेकर, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव यांनी घरामध्ये एंट्री केली. सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती देखील केली, बऱ्याच गप्पा गोष्टी केल्या. पुष्कर श्रोत्री यानं बिचुकलेंना बाहेर आल्यानंतर कॅसेट काढण्याचा सल्लाच दिला. यानंतर बिग बॉस यांनी सदस्यांवर साप्ताहिक कारी सोपवले. ज्यामध्ये दोन टीम करण्यात आल्या आहेत. आज घरामध्ये कोणाची तरी रहस्यमय एंट्री होणार आहे. कोण आहे हा गेस्ट आज कळेलच.

आज पुन्हा एकदा काळे कपडे घालून काही माणसांनी घरामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे घरातील सगळ्याच सदस्यांची घाबरगुंडी उडाली. त्यांनी अभिजीतला विचारले तिजोरीची चावी कोणाकडे आहे तेव्हा त्याने माहीत नाही असे उत्तर दिले. आणि त्यानंतर जेव्हा त्या माणसाने मास्क काढला तेव्हा अचानक सदस्यांच्या चेहर्याावर हसू उमटले. कोण आहे ही व्यक्ति ? आज टास्क मध्ये कोणाची टीम जिंकणार?  हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आजचा भाग रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.