खुशखबर ! आरबीआयकडून रेपो दरात कपात

07 Aug 2019 17:18:54


 


मुंबई : आरबीआयच्या पतधोरण समितीने नव्या रेपो दराची घोषणा करताना ०.३५ टक्क्यांनी कपात केली आहे. सलग चौथ्यांदा आरबीआयने रेपो दरात कपात केल्याने बँकांच्या कर्जाचे दर आणखी स्वस्त होणार आहेत. यामुळे कर्ज स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

चालू वर्षातील तिसरी पतधोरण समितीची बैठक ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान पार पडली. आरबीआयच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीचे अध्यक्ष आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आहेत. त्यांनी रेपो दरातील कपातीची घोषणा केली. आरबीआयच्या सहा सदस्यीय पत धोरण समितीने रेपो दरात ०.३५ टक्क्यांची कपात करून तो ५.४० टक्के केला तर रिव्हर्स रेपो दर ५.१५ टक्के केला.

Powered By Sangraha 9.0