'खिचिक' चा टीजर प्रदर्शित

    दिनांक  06-Aug-2019 18:13:03


प्रीतम एस. के. पाटील लिखित आणि दिग्दर्शित 'खिचिक' या चित्रपटाचा टीजर आज प्रदर्शित करण्यात आला. या टीजरमध्ये प्रथमेश परब आणि त्याच्याकडे पाठ फिरवून जाणारी मुलगी दिसत आहे. तो तिच्याकडे हात जोडून विनंती करत असताना पुढे जाऊन ती मुलगी एक कागदाचा बोळा खाली टाकताना दाखविण्यात आले आहे. आता त्या कागदावर काय आहे ? त्यावर लिहिलेल्या मजकुराचे कथेमध्ये काय महत्त्व आहे, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.

नावावरून हा चित्रपट एखाद्या छायाचित्रकारावर आहे का ? असे वाटते. मात्र, चित्रपटाची नेमकी कथा काय आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. या कुतुहलासह कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांची निर्मिती तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला यांची सहनिर्मिती असलेला 'खिचिक' हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.