'धडक गर्ल' आता 'कारगिल गर्ल' च्या भूमिकेत

    दिनांक  30-Aug-2019 16:05:20


'धडक गर्ल' जान्हवी कपूर आता गुंजन सक्सेना या 'कारगिल गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या शौर्यवतीवर आधारित जीवनपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. नुकतीच या चित्रपटामध्ये जान्हवी साकारत असलेल्या गुंजन सक्सेना यांच्या भूमिकेची काही पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गुंजन सक्सेना बरोबरच पंकज त्रिपाठी, नीना गुप्ता, अंगद बेदी हे देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत.

युद्धासाठी सर्वस्व पणाला लावलेली भारतातीय वायुसेनेतील पहिली महिला अधिकारी म्हणून गुंजन सक्सेना यांची भूमिका अतिशय आव्हानात्मक असेल. त्यामुळे त्यांची भूमिका प्रभावीपणे साकारण्यासाठी जान्हवीने बराच काळ प्रशिक्षण देखील घेतले आहे.जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी देखील गुंजन सक्सेना या आगामी चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट करत जान्हवीचे कौतुक केले आहे.

शरण शर्मा दिग्दर्शित 'गुंजन सक्सेना' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करणार असून हा चित्रपट १३ मार्च २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.