चर्चा तर होणारच... २० लाखांपेक्षा जास्त सामने खेळून होतोय निवृत्त

    दिनांक  30-Aug-2019 19:01:29


 


मुंबई : सध्याच्या क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा होत आहे. ती म्णजे २० लाखांहून अधिक सामने खेळून ७००० विकेट्स घेतलेल्या क्रिकेटपटूंच्या निवृत्तीची. या महान क्रिकेटपटूंचे नाव आहे सेसिल राईट. वेस्ट इंडिजच्या हा क्रिकेटपटू वयाच्या ८५व्या वर्षी निवृत्ती घेत आहे. यांनी त्यांच्या ६० वर्षांपेक्षा जास्तच्या कारकिर्दीत तब्बल ७ हजार विकेट घेतल्या आहेत.

 

वेगवान गोलंदाज असलेल्या सेसील राईट यांनी जमैकाकडून बारबाडोसविरुद्धच्या सामान्यामधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी बारबाडोसच्या संघामध्ये वेस हॉल आणि सर गार्फिल्ड सोबर्स हे दिग्गज होते. ७ सप्टेंबरला ते त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणार आहेत, अशी माहिती उपरमिल क्रिकेट क्लबकडून देण्यात आली आहे.

 
 
 

सेसील राईट यांनी बार्बाडोस संघाचे प्रतिनिधित्व केले असून वेस हॉलला वेगवान गोलंदाजी केली आहे. त्यानंतर १९५९ ते इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांनी सेंट्रल लँकशायर लीग स्पर्धेत क्रॉम्प्टन संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांना १९६२मध्ये इंग्लंडमध्ये आयुष्याची जोडीदार एनीड सापडली. एनीड यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावर सेसील यांनी इंग्लंडमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

 

सेसील राईट यांनी एकूण ६० वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत सुमारे २ लाखांहून अधिक सामने खेळले असून ७०००हून अधिक बळी टिपले आहेत. उमेदीच्या काळात तर त्यांनी ५ हंगामात मिळून ५३८ विकेट घेतले होते. इतक्या समृद्ध कारकिर्दीनंतर अखेर सेसील यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.