सावधान ; मुंबई व अलिबाग क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता

03 Aug 2019 15:15:26




२४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा स्कायमेटचा अंदाज

 

मुंबई : कोकण क्षेत्रात सक्रिय असलेल्या मान्सूनच्या लाटांमुळे येत्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. मुंबई, अलिबाग, रत्नागिरी, हर्णै, वेंगुर्ला, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि औरंगाबाद यांचा यात समावेश असून मुंबई व अलिबाग क्षेत्रात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून महाराष्ट्रातील किनारी भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत १०० मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथिल नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, मागील २४ तासात, अलिबागमध्ये १२२ मिमी, सांताक्रूझमध्ये १४४ मिमी, डहाणूमध्ये १७७ मिमी, ठाणेमध्ये ५७ मिमी, वर्धामध्ये ५२ मिमी, ब्रह्मपुरीमध्ये ६३ मिमी, नांदेडमध्ये ६० मिमी, बुलडाणामध्ये ५५ मिमी, हर्णैमध्ये ८१ मिमी, रत्नागिरीमध्ये ६६ मिमी, परभणीमध्ये ४० मिमी आणि सातारामध्ये ४८ मिमी पाऊस झाला असल्याची माहिती स्कायमेटने दिली आहे.

Powered By Sangraha 9.0