रानभाज्यांचा आस्वाद घेण्याची सुवर्णसंधी...

    दिनांक  03-Aug-2019 12:10:24 


रोहिणी कृषी पर्यटनतर्फे रानभाजी (वनभाजी) महोत्सवाचे आयोजन


पालघर : आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विविध रानभाज्यांची माहिती नवीन पिढीला व्हावी यासाठी 'रोहिणी कृषी पर्यटन'तर्फे रानभाजी (वनभाजी) महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि. ११ ऑगस्ट रोजी विक्रमगड तालुक्यातील लेले पाडा, बोरांडा येथे हा महोत्सव भरणार आहे. आपल्या दैनंदिन जीवनात रानभाज्यांच्या औषधी गुणधर्म तसेच पौष्टिकत्वाची माहिती करून घेण्यासाठी महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

 
 

वनस्पतींच्या कोणत्या भागापासून भाजी बनवितात, औषधी उपयोग व पौष्टिकता काय, भाजी कोणत्या भागात व काळात मिळते, भाजी बनविण्याची कृती तसेच संवर्धनाविषयी काय करता येईल ?  याविषयी यात माहिती देण्यात येणार आहे. ११ ऑगस्टला सकाळी १०.०० ते २.०० पर्यंत हा महोत्सव चालणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही किरण लेले (९२८४०६७१२० / ९८६०१६१६३२) व मेघा लेले (९४२२६८२१२३) यांच्याशी संपर्क साधू शकता.