आज भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-ट्वेन्टी सामना रंगणार

    दिनांक  03-Aug-2019 12:58:23


भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात आजपासून टी ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात तीन टी ट्वेंटी सामने, तीन एक दिवसीय सामने, तर दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. हा सामना सेंट्रल ब्रॉव्हर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लाऊडरहील येथे खेळवला जाणार आहे. रात्री ८ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

आजच्या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय क्रिकेट संघात कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, खलिल अहमद, दीपक चाहर, राहुल चाहर, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, कृणाल पंड्या, रिषभ पंत, के एल राहुल, नवदीप सैनी, वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे.

सामन्या पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने "रोहित शर्मा आणि मला भारतीय क्रिकेट संघाला सर्वोच्च स्थानावर नेऊन पोहोचवायचे आहे" अशी इच्छा व्यक्त केली. आता ही इच्छा या टी ट्वेन्टी मध्ये पूर्ण होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची चांगली कामगिरी बघता या सामन्याकडून देखील चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.