काश्मीरप्रश्नी रशियानेही दिला पाकला इशारा

    दिनांक  28-Aug-2019 16:53:05


 


विदेश मंत्रालयाचे मोठे यश : जम्मू-काश्मीर प्रश्न हा भारता अंतर्गत मुद्दा

 
 

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर प्रकरणी रशियाकडूनही आता प्रतिक्रीया देण्यात आली आहे. भारतातील रशियाचे राजदूत यांनी हे प्रकरण भारतातील अंतर्गत असल्याचे मत भारतातील रशियाच्या दुतावासांनी नोंदवले आहे. भारत-पाकिस्तान प्रश्न चर्चेने सोडवायला हवेत, असे मत रशियन दूतवास उपप्रमुख रोमन बबुशकिन यांनी व्यक्त करण्यात आले आहे. 

 

ते म्हणाले कि, "कलम ३७० हटवणे हा भारत सरकारचा संपूर्ण अंतर्गत निर्णय आहे. शिमला करार, लाहोर घोषणापत्र आणि अन्य निर्णयांबद्दल चर्चेने निर्णय घ्यायला हवेत." परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या दोन दिवसांच्या बैठकीदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.


भारतातील रशियन दूतवास उपप्रमुख रोमन बबुशकिन म्हणाले,
" जोपर्यंत दोन्ही पक्ष मध्यस्तीसाठी आग्रह करत नाहीत. तोपर्यंत भारत-पाकिस्तान प्रकरणी रशियाची कोणतिही भूमिका नाही. संयुक्त राष्ट्रात बंद दाराआड झालेल्या चर्चेतही आम्ही जम्मू काश्मिर हा भारतातील अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे."