बहरीनमधील दोनशे वर्षे जुन्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Aug-2019
Total Views |



 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला योजनेचा शुभारंभ

 
 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनची राजधानी मनमा येथे भगवान श्रीकृष्णाच्या दोनशे वर्ष जुन्या मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी ४२ लाख डॉलरच्या योजनेला रविवारी शुभारंभ केला. मनमा येथील श्रीनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी या वर्षापासूनच सुरुवात केली जाणार आहे. मनमा स्थित या दोनशे वर्ष जुन्या मंदिराला ४२ लाख डॉलर रुपयांच्या निधी दिला जाणार असून ४५ हजार चौरस वर्ग फूट क्षेत्रात तीन मजली भवन उभारले जाणार आहे.



 


पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि. २४ ऑगस्ट रोजी या ठिकाणी पोहोचले होते. बहरीनला भेट देणारे ते पहिले पंतप्रधान आहेत. यावेळी नरेंद्र मोदींचा ज्या ज्या मुस्लीम देशांनी पुरस्कार देत गौरव केला, त्यात बहरीनच्या 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनसां', पॅलेस्टाईनच्या 'ग्रॅण्ड कॉलर ऑफ द स्टेट आफ पॅलेस्टाईन', अफगाणिस्तानच्या 'आमिर अमानुल्लाह खान' पुरस्कार, सौदी अरेबियाच्या 'किंग अब्दुलअजीज शाह' पुरस्कार, मालदीवच्या 'रुल ऑफ निशान इज्झुद्दीन' आणि आता युएईच्या 'ऑर्डर ऑफ झायेद'चा समावेश आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जातो. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रविश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहरीनचे वली अहद सलमान बिन हमाद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेतली. या भेटीनंतर व्यापार संबंध संस्कृती आदान- प्रदान संदर्भातील दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यास मदत होईल.

@@AUTHORINFO_V1@@