रितेश आणि आयुषमानचा जलवा पहा 'ढगाला लागली कळं' गाण्यात

    दिनांक  27-Aug-2019 15:44:03


 


आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत असलेल्या
'ड्रीम गर्ल' या चित्रपटातील 'ढगाला लागली कळं' हे दादासाहेब कोंडके यांच्या मराठी चित्रपट सृष्टीला दिलेल्या प्रसिद्ध गाण्याचे नवीन व्हर्जन आज प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. यावर्षीच्या गणोशोत्सवासाठी एकदम साजेसे असे हे गाणे कुमार यांनी शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचा ताल कोणालाही ठेका धरायला भाग पाडेल. या गाण्यात रितेश देशमुख चा विशेष सहभाग हे विशेष आकर्षण ठरेल.

'ढगाला लागली कळं' हे दादासाहेब कोंडके यांनी अजरामर केलेले गाणे अशा नव्या स्वरूपात येईल याची कल्पना आत्तापर्यंत कोणीच केली नव्हती. दरम्यान या गाण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलकडे प्रेक्षक आकर्षित होतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

नुकतेच या चित्रपटातील दिल का टेलिफोन नावाचे गाणे प्रदर्शित झाले होते आता हे आणखी एक गाणे आज चित्रपटाच्या जुकबॉक्समध्ये अ‍ॅड झाले. राज शांडिल्य दिग्दर्शित 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट १३ सप्टेंबरला प्रदर्शित होईल.