फ्रान्स, स्पेन, श्रीलंका अशा एकूण १२ देशांमध्ये आहे चिदंबरम यांची संपत्ती !

27 Aug 2019 10:41:02


 


नवी दिल्ली : आयएनएक्स मीडिया प्रकरणात सक्तवसुली संचलनालय (इडी) चौकशी सुरू असलेल्या पी. चिदंबरम यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. चिदंबरम यांनी एकूण १२ देशांमध्ये संपत्ती जमावल्याचा आरोप इडीने केला आहे. काँग्रेसचे सहआरोपी नेते परदेशातील चिदंबरम यांची संपत्ती विकल्याचे आणि बॅंक खाती बंद केल्याच्या पुराव्यांशीही छेडछाड करत आहेत. सोमवारी चिदंबरम यांची कोठडी वाढवून घेण्याची मागणी करताना इडीने हे आरोप केले आहेत.

 

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात इडीने दावा केला आहे की, 'चिदंबरम आणि प्रकरणातील अन्य आरोपींनी अर्जेन्टिना, ऑस्ट्रिया, ब्रिटिश, वर्जिन, आइसलॅण्ड, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनॅको, फिलीपिन्स, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, स्पेन, श्रीलंका आदी ठिकाणी त्यांची बॅंक खाती आहेत. त्यासह शेल (बनावट) कंपन्यांच्या माध्यमातून या खात्यांमध्ये व्यवहार केला जात आहे.'

 

चिदंबरम यांचा जामिनाची मागणी फेटाळत पुराव्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप इडीने केला आहे. इडीने आपल्याकडे सबळ पुरावे असल्याचा दावा केला आहे. त्या आधारे चिदंबरम यांचा जामीन फेटाळण्याची मागणीही केली जात आहे. आरोपी केवळ पुराव्यांशी छेडछाड करत नाहीत, तर साक्षीदारांनाही फूस लावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप इडीने केला आहे.

Powered By Sangraha 9.0