प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा अपघात : वाहक गंभीर

    दिनांक  27-Aug-2019 10:10:02

पुणे : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला इंदापूरनजीक अपघात झाला. अपघातात आनंद शिंदे
यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, त्यांच्या कारचा चुराडा झाला. आनंद शिंदे हे सोलापूरला रवाना झाले असताना मध्यरात्री दोन वाजता पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूर येथील बळपुडी गावाजवळ हा अपघात झाला.

 

अपघातानंतर आनंद शिंदे यांना इंदापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने आनंद शिंदे यांना मोठी दुखापत झाली नाही. या अपघातानंतर आनंद शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले. गाडीत आनंद शिंदे यांच्यासह चौघेजण होते. मात्र, त्यांचा वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे.