विंडीज समोर भारत 'अजिंक्य' : कसोटी सामन्यात ३१८ धावांनी दणदणीत विजय

26 Aug 2019 10:02:22
 



अँटिग्वा : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीज संघाला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले. भारतीय संघाने केलेल्या ४१७ धावांचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ शंभर धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने पाच आणि इशांत शर्माने तीन बळी घेतले, तर धडाकेबाज फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले.



 

 

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणेचे शतक (१०२) आणि हनुमा विहिरीच्या ९३ धावांच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला विजयासाठी ४१७ धावांचे आव्हान दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या लंदाजांची पुरती दैना उडाली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांच्या भेदक गोलंदाजीमुळे विंडीजचे  पराभव फलंदाज हतबल झाले. त्यामुळे वेस्ट इंडिजची अवस्था ९ बाद ५०, अशी झाली. शेवटच्या गड्यासाठी केमार रोच आणि कमिन्स यांनी ५० धावांची भागीदारी केली. विंडीजला शंभरचा आकडा गाठून दिला पण अखेर इशांत शर्माने केमार रोचला माघारी पाठवत भारताला दणदणीत विजय मिळवला.

 

वेस्ट इंडिज बहुतांश फलंदाज स्वस्तात माघारी परतले. केवळ तीन खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या केमार रोचच्या सर्वाधिक ३८ धावा झाल्या. भारतातर्फे बुमराहने पाच, इशांतने तीन तर शमीने दोन गडी टिपले आहेत. अजिंक्य रहाणेला मिळालेल्या संधीचे त्यांने सोने केले. त्याला सराव सामन्यात अर्धशतक झळकावता आले होते, त्याचा हाच आत्मविश्वास सामन्यातही कायम दिसला. पहिल्या डावात ८१ धावांची दमदार खेळी त्याने केली होती. दुसऱ्या डावात १०२ धावांची खेळी करून सामनावरी ठरला. दोन्ही डावात मिळून १८३ धावा ठोकल्या. हनुमा विहारीने (९३) याने त्याला उत्तम साथ दिली.

 
Powered By Sangraha 9.0