वर्ल्ड आयुष एक्स्पोमध्ये योग कार्यशाळेचे आयोजन

24 Aug 2019 15:20:47


 


नवी मुंबई :वर्ल्ड आयुष एक्स्पो २०१९ व आरोग्य हे वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांना जोडणारे संमेलन गेले २ दिवस सिडको येथील एक्सिबिशन सेंटर येथे सुरु आहे. या संमेलनाला आत्तापर्यंत अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली असून महाराष्ट्रातील विविध राज्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी संमेलनामध्ये हजेरी लावली आहे. आजच्या संमेलनाच्या तिसऱ्या दिवशीचा एक महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळा. या कार्यशाळेमध्ये भारतभरातून योग विषयातील तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शनासाठी उपस्थिती दर्शवणार आहेत. ही कार्यशाळा 'योग' या संकल्पनेबद्दल जाणून घेण्याची इच्छा असलेले आणि या उपक्रमाबद्दल फारशी माहिती नसलेले देखील या कार्यशाळेचा भाग होऊ शकतात.

 

आंतरराष्ट्रीय योग कार्यशाळा या चार दिवसीय शिबिराचा आजचा तिसरा दिवस असून आज या कार्यशाळेत क्रिया, योग आणि रोग प्रतिकारशक्ती, पाठदुखी आणि योग, लहान मुलांसाठी योग आणि योग निद्रा या विषयांवरील कार्यशाळा पार पडणार आहेत. ही कार्यशाळा अंबिका योग कुटीर, डॉ. जंजिराला, दुर्गादास सावंत, किशोर आंबेकर आणि विकास गोखले या तज्ज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनात संपन्न होणार आहे. या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्यास तुम्ही योग साधनेविषयीची मूलभूत माहिती जाणून घेऊ शकाल आणि योग क्षेत्रात अधिक कार्यक्षमतेने काम करण्यास तयार होऊ शकाल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Powered By Sangraha 9.0