श्रीकृष्ण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019   
Total Views |

 
 
अमेरिकेत घडविल्या गेलेल्या जगातल्या पहिल्या अणुर्सेंेटाच्या चाचणीनंतर जे दृश्य साकारले ते बघितल्यावर, चाचणी करणार्या ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर नामक शास्त्रज्ञाने व्यक्त केलेले मत अद्भूत आहे. महाभारतात युद्धादरम्यान, समोर उभ्या ठाकलेल्या आप्त, स्वकीयांविरुद्ध लढण्यास नकार देणार्या अर्जुनाला गीतेच्या माध्यमातून जे ज्ञानामृत भगवंतांनी दिले, त्यानंतर आपल्या विराट रुपाचे जे दर्शन श्रीकृष्णाने घडवले, त्याचे वर्णन अर्जुनाने केले आहे. एकाचवेळी हजारो सूर्य चमकत असल्याचा भास व्हावा इतका लख्ख प्रकाश त्यावेळी आसमंतात जाणवत होता. मीच या सृष्टीचा निर्माता, मीच त्याचा पालनकर्ता अन् मीच विनाशक ... ज्युलियस रॉबर्ट म्हणतात, अणूचाचणीनंतर जो र्सेंेट झाला, सारा परिसर प्रकाशमय झाला, तेव्हा मला महाभारतात वर्णन असलेले श्रीकृष्णाचे विराट रुपदर्शन आठवले. अर्जुनाने विशद केलेल्या भगवंतांच्या शब्दांसह...
ते व्यक्तिमत्व खरोखरीच विलक्षण आहे. भगवंतापेक्षाही, मनुष्यरुपात सर्वसामान्य जीवन जगत तो जो, असामान्यतेचा परिचय देतो, ते तर त्याहून आगळं असतं. त्याने अधरावर धरलेल्या बासरीतून बाहेर पडणारे सप्तस्वर तर जणू सार्या आसमंताला मोहीनी घालतात. तो युद्धही तेवढ्याच शिर्तोंीनं लढतो. त्याचवेळी तो हिकमतीही असतो. त्या अर्थाने तो बुद्धिवान, मुत्सद्दीही असतो. एरवी युद्धकौशल्य आणि बुद्धिचातुर्याचा संगम सहसा गवसत नाही. पण भगवंतांच्या ठायी तो मीर्लोंही लीलया साधला गेलाय्. त्याचवेळी तो भक्तवत्सल, कनवाळूही असतो. त्याला प्राणीशास्त्र कळते. गायींच्या सान्निध्यात वावरताना वर्तनातून त्याला गायही उमगते अन् सारथ्याच्या भूमिकेत वावरताना घोड्याच्या वेगापासून तर रागापर्यंतच्या बाबींचाही अभ्यास झालेला असतो. खरं तर, शल्य, नकुल, सहदेवांचा अपवाद वगळता इतर कुणालाही ते कसब सिद्ध करता आलेले नसते. मृत अभिमन्यूच्या डोक्याला लाथ मारणार्या जयद्रथाचे अस्तित्व संपविण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण व्हावी म्हणून खग्रास सूर्यग्रहणाच्या मुहूर्तानुरूप सुदर्शनचक्राआड सूर्य जाईल अन् सूर्यास्त झाल्याचा भास होऊन अर्जुनाला जयद्रथावर बाण चालवता येईल याचे अचूक गणित मांडून घडलेल्या घडामोडी भगवान श्रीकृष्णाच्या खगोलशास्त्राच्या ज्ञानाचीही साक्ष देतात. स्वत:ची नारायणी सेना कौरवांच्या बाजुने उभी करून स्वत: नि:शस्त्र पांडवांच्या साथीला उभे राहण्याची भूमिका त्यांच्यातला आत्मविश्वास स्पष्ट करते. एकाचवेळी चक्र, गदा, पद्म धारण करण्याची शक्ती एव्हाना कुणाच्याही वाट्याला येईल, असे होणे अशक्यप्राय. भगवंतांनी स्वत:च्या र्अेंाट कर्तृत्वातून, क्षमतेतून ती शक्ती कमावली होती. सृष्टीनिर्मात्याच्या विविध रुपांतले श्रीकृष्णाचे रूप मुळातच मनुष्याला भावणारे. जवळचे वाटणारे. कारण त्याच्यातल्या रसिकाग्रणीपासून तर दही-लोण्यासाठीच्या खोडकरपणापर्यंत अन् राधेच्या सोबतीने वावरण्यापासून तर युद्धभूमीवर अर्जुनाला कर्मयोग सांगण्यापर्यंत... त्याचे जगणे, वागणे, त्याच्या सार्या भूमिका लोकांना खर्याखुर्या वाटतात. ‘आपल्या’ वाटतात.
स्ट्रक्चर, इर्ने्रंस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर असे तीन भाग आहेत. व्यक्ती स्वत:, साधन सामुग्रीसह आणि इतकेच नव्हे तर स्वत:ची बुद्धिमत्ता, धैर्यादी गुणांसह एखाद्याच्या पाठीशी किंवा सोबतीने उभी राहते, ते महत्वाचे. सुदामा असो, अर्जुन असो वा मग विदुर. श्रीकृष्ण मित्र म्हणून त्यांच्या समवेत राहिले ते स्ट्रक्चर, इर्ने्रंस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर, या तीनही अंगाने. कुठेही, कशाचीही उणिव मागे न ठेवता, किंतु-परंतु न बाळगता, ठामपणे सोबतीने उभा राहणारा सखा म्हणजे कृष्ण. तो मृत्यूचे वास्तवही मांडतो अन् तोच जीवनाचे मर्मही सांगतो. जीर्ण झालेली वस्त्र सहज बाजूला टाकून नवी वस्त्र परिधान करावीत तसेच आत्मा एक शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो, हे गंभीर वास्तव सहजतेने मांडणारे भगवान श्रीकृष्ण दुसरीकडे जीवन हा उत्सव असल्याचे स्पष्ट करीत, ते जगण्याच्या नाना तर्हा अधोरेखित करतात. क्षण रंगोत्सवाचा असो, दहीहांडीचा, की मग टिपर्यांच्या खेळाचा... आनंदाची उधळण करत, विखुरलेल्या क्षणांची मनमुराद लयलूट करीत हृदयाच्या कप्प्यात त्याची साठवण करीत पुढे जाण्याची न्यारी तर्हा त्यांनी जागापुढे मांडली आहे. जीवन आणि मृत्यूची महती एकाच व्यक्तीद्वारे एकाचवेळी विवेचित होण्याची उदाहरणे अन्यथा विरळाच. पण श्रीकृष्णाने त्याचीही सांगड लीलया घातलेली दिसते. म्हणूनच की काय पण, भारतीय समाजाला केवळ जगण्याची दिशाच नव्हे तर, तत्वज्ञानाची बैठकही त्यांनी दिली असल्याचेही स्पष्ट होते. अमेरिकेत 1945मध्ये पहिली अणुचाचणी घेणार्या शास्त्रज्ञालाही त्याने संशोधनातून घडविलेल्या र्सेंेटाच्या दृश्यातून दूरस्त भारतात मान्यता पावलेल्या भगवंतांच्या प्रतिमेचे, त्यांच्या वचनाचे स्मरण व्हावे, हा परिणाम श्रीकृष्णाच्या भावलेल्या प्रतिमेचा, त्यांच्या प्रभावी विचारांचा, ओजस्वी वाणीतून प्रकटलेल्या वचनांचा असतो. न्यू मेक्सिकोतील र्‘ेंादर र्ऑें द अॅटोमिक बॉम्ब’ ही उपाधी लाभलेल्या एका शास्त्रज्ञाचे हे विधान, विज्ञानाचा मार्ग अनुसरणे म्हणजे परमेश्वरी शक्तीचे अस्तित्व झुगारण्याची पहिली पायरी असल्याचा ग्रह करून बसलेल्या तमाम भारतीय मंडळीच्या थोबाडीत हाणणारे ठरावे.
प्रत्येक काळाची एक भाषा असते. स्वाभाविकच महाभारत काळाचीही एक भाषा होती. गीतेतील भाषा त्या तुलनेत अर्वाचीन मानली जाते. महाभारतात साधरणपणे द्रौपदी स्वयंवराच्या आसपास अवतरणारे कृष्णाचे पात्र, हरिवंशातून उमगणारी त्याची व्यक्तिरेखा, सुबक, सुंदर, मनमोहक, सर्वगुण संपन्न, दिसायला सावळे पण तरीही तेजस्वी असे रूप. मथुरेतला जन्म. उज्जैनच्या परिसरातील सांदिपनी आश्रमात शिक्षण. ते पूर्ण करून परतल्यावर मथुरेवरची जरासंधाची किमान सतरा आक्रमणं, युद्धाची सारे कौशल्य पणाला लावून परतवण्यात यश संपादन केल्यानंतर मथुरेवरील वारंवारची संकटं टाळण्यासाठी अजून दूरवर द्वारका नगरी वसविण्याचा निर्णय... अक्रुराने दिलेल्या निमंत्रणामागील घातपाताच्या शक्यतेची पूर्ण कल्पना असतानाही, त्यांच्या सोबत जाणे, त्यांनी केलेल्या आघाताला त्याच तोडीचे प्रत्युत्तर देणे, निकराने लढणे ... सारेच अद्भूत आहे. म्हणूनच की काय, पण भारतीय तत्वचिंतकांनी देवत्व बहाल करूनही, एका असामान्य मनुष्याच्या रुपातच श्रीकृष्णाची व्यक्तिरेखा आणि त्याचे तत्वचिंतन जगापुढे मांडले आहे. बहुधा म्हणूनच ते लोभस रुप इतरेजनांनाही भावले आहे. मृत्यूनंतरचा काळ कल्पून त्याबरहुकूम वागण्याची शिकवण, सोबतच जिवंत असेपर्यंत कसे वागायचे हे सांगणारा कर्मसिद्धांत म्हणजे श्रीकृष्ण आहे. अर्जुनाला गीतेतून उपदेश करेपर्यंतच तो ‘भगवंत’ आहे. रणांगणावर विराट रूपदर्शन घडवित असतानाच तो आपण जगन्नियंता असल्याचे सांगतो. एरवी तो सवंगड्यांसोबत शिंक्यातले लोणी पळवणारा, सत्याच्या बाजूने उभे राहणारा, मित्राच्या मदतीला धावून जाणारा, द्रौपदीच्या हाकेला ओ देणारा, अर्जुनाला कर्णाची महती सांगणारा, स्वत:च्या ताकदीची कल्पना असतानाही पांडवांना यशापयाशाचे, सुख-दु:खाचे अडथळे पार करीत परिस्थितीला, प्रसंगी युद्धाला सामोरे जाण्याचा सल्ला देणारा, त्यांच्या अरण्यवासाच्या काळात धैर्य देणारा, वेळ बाका आला तर त्यातून बाहेर पडण्याच्या क्लृप्त्या सांगणारा, सोबती असतो. तो अभयंकर असतो. तो अद्वैत असतो. तो अप्रमेय असतो. तो ज्योतिरादित्य असतो. तो केयूर असतो... त्याला राधाही कळते अन् कंसही. त्याला विदुरही ठावूक असतो अन् दुर्योधनही.
भगवंत स्वत:चं वर्णन अर्जुनासमोर करतात, तेव्हा या सृष्टीतील जे जे म्हणून उदार, उन्नत, उत्तम, महत्मधूर असेल, ते ते ‘मी’ असल्याचे सांगतात. ऋतुत मी कुसुमाकर आहे, मासांत मागशीर्ष, पर्वतात मेरू, शिखरात कैलास, महर्षींमध्ये भृगु, सिद्ध पुरूषांत कपिल मुनी असल्याचे सांगत असताना नरांत मात्र आपण धनंजय, म्हणजेच अर्जुन असल्याचे भगवंत खुद्द अर्जुनाला सांगतात. इतर उदाहरणांच्या पंक्तीत ‘अर्जुन’ विराजमान करताना कौंतेयाची प्रतिमा, त्याचे धैर्य उन्नत करीत त्याच्यातील विश्वास जागवण्याचाही तो प्रयत्न असतो. श्रीकृष्णाच्या आयुष्यभरातील यशाचं गमक काय असेल? असं म्हणतात की श्रीकृष्णाने आपला क्रोध उजव्या पायाच्या अंगठ्यात दाबून ठेवला होता. संपूर्ण अवतारकाळात केवळ तीन वेळा तो अंगठा उंचावला गेला. जेव्हा तसं घडलं तेव्हा रणकंदनच झालं. पण एरवी, तो जगन्नियंता सार्या प्रश्नांना हसतमुखाने सामोरा गेला. मानवी समुहाला तरी त्याचे यापेक्षा वेगळे काय सांगणे आहे?
@@AUTHORINFO_V1@@