छत्तीसगढमधील चकमकीत ५ नक्षलवादी ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |


 

छत्तीसगढ : छत्तीसगढमधील नारायणपूर याठिकाणी सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. या गोळीबारात सुरक्षा दलातील दोन सैनिक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ज्या भागात चकमक झाली त्या भागातील जंगलांमध्ये शोध मोहीम सुरू आहे. या नक्षलवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. चकमकीनंतर या परिसरात 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

 

शनिवारी सकाळी नारायणपूर जिल्ह्यामध्ये ही चकमक झाली. या भागात शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. यालाच प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार सुरू केला. नारायणपूरमधील अबुझमाड भागातील जंगलांमध्ये ही चकमक झाली. पाच नक्षलींना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले असले, तरी गोळीबारादरम्यान काही नक्षलवादी पळून गेल्याचेही कळते.
@@AUTHORINFO_V1@@