‘प्राची’च्या गणेशमूर्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Aug-2019
Total Views |
 
  

जिथे ‘कला’ म्हणण्यापेक्षा कलेच्या प्रत्येक प्रांगणात सर जेजेचे विद्यार्थी नसतील तरच नवल! सध्या सर जे. जे. उपयोजित कलेच्या तिसर्‍या वर्गात कलाध्ययन करणार्‍या प्राची अंकुश मेस्त्री हिने श्रीगणेशमूर्ती बनविल्या जाणार्‍या सिंधुदुर्गातील आपल्या वडिलोपार्जित तीन पिढ्यांच्या कारखान्यात लक्ष घातले आहे. जेजेत कलाध्ययन करताना रंग-रंगाच्या भावव्यक्ती, रंगांच्या प्रकृती वगैरे बाबींचा अभ्यास होतो. त्याच ज्ञानाद्वारे प्राचीने तिच्या वडिलोपार्जित व्यवसायाला ‘कॉर्पोरेट’स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

  

गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाला आवडणार्‍या प्रत्येक वस्तूची निर्मिती करणार्‍या हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला. कोल्हापूर, सांगली महापुराने झालेल्या, भरून न येणार्‍या नुकसानीचे सावट या गणेशोत्सवावर असले तरी रोजगाराच्या अनेक वाटा याच उत्सवाद्वारे मिळत असल्यामुळे अनेक कुटिरोद्योग तेजीत आहेत. गौरी-गणपतीचे दागिने, सजावटीचे साहित्य, प्रकाशदिव्यांच्या माळा, कागदी मखर, पूजेचे साहित्य, सुगंधी द्रव्य, पाने-फुले-फळे यांची विक्री, आकर्षक मूर्ती अशा विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तुनिर्मितींच्या व्यवसायांना पालवी फुटलेली आहे.
 
 
जिथे ‘कला’ म्हणण्यापेक्षा कलेच्या प्रत्येक प्रांगणात सर जेजेचे विद्यार्थी नसतील तरच नवल! सध्या सर जे. जे. उपयोजित कलेच्या तिसर्‍या वर्गात कलाध्ययन करणार्‍या प्राची अंकुश मेस्त्री हिने श्रीगणेशमूर्ती बनविल्या जाणार्‍या सिंधुदुर्गातील आपल्या वडिलोपार्जित तीन पिढ्यांच्या कारखान्यात लक्ष घातले आहे. जेजेत कलाध्ययन करताना रंग-रंगाच्या भावव्यक्ती, रंगांच्या प्रकृती वगैरे बाबींचा अभ्यास होतो. त्याच ज्ञानाद्वारे प्राचीने तिच्या वडिलोपार्जित व्यवसायाला ‘कॉर्पोरेट’स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे ३०० गणेश मूर्तिकार आहेत. त्यांच्या संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारे प्राचीचे वडील, मूर्तिकार अंकुशराव मेस्त्री यांनाही मूर्तिकला त्यांच्या तीर्थरुपांकडून मिळाली. पुंडलिक मेस्त्री यांनी मूर्तिकामास सुरुवात केली. आज या कारखान्यास प्राचीच्या कलासाधनेमुळे अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले आहे. या वर्षी प्राचीने दिलेल्या माहितीनुसार, लहान आकारांपासून सुमारे सहा फूट आकारांपर्यंतच्या अत्यंत सुंदर सुबकमूर्ती त्यांच्या कारखान्यात साकारल्या जातात. त्यापैकी आगाऊ ऑर्डर नोंदवून यावर्षी सहा फूटांपर्यंतच्या ‘लाईफ साईज’मूर्तींची संख्या १२० असून लहान-लहान आकारांतील मूर्ती असंख्य आहेत.
 

 

प्राची आणि तिच्या कुटुंबीयांपैकी तिचे आई, वडील, काका, चुलत भाऊ असे सारे एकत्र कुटुंबीयच श्रीगणेशमय झालेले आहेत. प्राची मात्र या सार्‍या मूर्तीच्या रंगकामावर अखेरचा हात फिरविण्यात सध्या व्यस्त आहे. डोळे, गंडा, भुवया, हातावरील रेषा, पापण्या वगैरे अत्यंत बारीक, परंतु सौंदर्य वाढविणारी कामे प्राची करीत असते. अभ्रक, पर्लरंग, अ‍ॅक्रॅलिक, बेससाठी एशियन कलर, वेलवेट, सिगी (म्हणजे चमकी) यांचा मूर्ती रंगविताना वापर केला जातो. मग बाळूमामाच्या वेशातील, मल्हारी वेशातील, विठ्ठलाच्या रुपातील, स्वामींच्या वेशातील अशा विविध गणेशरुपांनी प्राचीचा कारखाना सजलेला असतो. प्राचीला जेव्हा एक प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली, “जेजेतील रंगकला अध्ययनामुळे, आमच्या कारखान्यातील गणेशमूर्तीच्या सुबकसौंदर्यात अधिक संपन्नता आणि प्रसन्न सात्त्विकता आली.”

 

-प्रा.गजानन शेपाळ
@@AUTHORINFO_V1@@