म्हणी खऱ्या करणारा पाकिस्तान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019   
Total Views |



पाकिस्तान भारताशी बोलला नाही तर भारताचे काही नुकसान होणार आहे का? तसे काहीही नाही, उलट पाकिस्तानने नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून भारताला त्रास द्यायचे काम केले. बलवान तरुणाने अर्धवट समज असलेल्या दुर्बलाकडे समजदारीने दुर्लक्ष करावे, असेच भारताचे वागणे असते.


सर्वार्थाने हवालदिल झालेल्या जनतेचा पाकिस्तान हा देश. पण, या देशाबाबत म्हणायचे तर 'सुंभ जळला तरी पीळ गेला नाही.' कसा जाणार म्हणा, कुत्र्याचे शेपूट नळीत घाला, चुलीत घाला, ते वाकडे तर वाकडेच राहणार. नेहमी असे वाटत राहते की, मराठीतल्या सगळ्या उपरोधिक म्हणी या पाकिस्तानसाठीच निर्माण झाल्या की काय? असे पाकिस्तानचे म्हणजे त्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांचे वागणे. जसे 'मी नाही त्यातली, कडी लावा आतली', 'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण,' 'गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता,' 'नाचता येईना, अंगण वाकडे,' 'कोल्ह्याला द्राक्षे आंबट...' आणखीन कितीतरी म्हणी.. जणू काही या साऱ्या म्हणी पाकिस्तानसाठीच जन्मलेल्या!! बरं, या देशाच्या अनैसर्गिक निर्मितीपासून त्यांचे या म्हणींशी नाते आहे. या देशाने नेहमी भारताच्या कुरापती काढल्या. शेरास सव्वाशेर बनत भारताने या देशाला आस्मान दाखवले. पण, या देशाचे कसे 'गीरे भी तो टांग उपर.' अरे हो, मराठी तर मराठी हिंदी म्हणीसुद्धा याच देशासाठी उदाहरणार्थ 'बेगाने शादीमे अब्दुल्ला दिवाना' किंवा 'बिच में मेरा चांद भाई' वगैरे वगैरे हिंदी उर्दू म्हणी पण याच देशासाठी. तर मराठी-हिंदी म्हणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या देशाचा जन्म झाला की काय असे वाटावे, असा हा देश. आता या नापाक देशाची आठवण होण्याचे कारण की, या देशाचे वजिर-ए-आझम म्हणतात, "आता भारताशी बोलायचेच नाही." आता यांना कुणी आमंत्रण दिलेय का? की भारताशी बोला हो. 'मान ना मान तू मेरा मेहमान,' असे हे वागणे. यांना कुणी आमंत्रण देत नाही, कुणी भीक घालत नाही. पण, नसलेल्या मिशांना पीळ देत पाकिस्तानचे वजिर-ए-आझम स्वगत म्हणतात की, 'भारताशी बोलायचे नाही.'

 

पाकिस्तान भारताशी बोलला नाही तर भारताचे काही नुकसान होणार आहे का? तसे काहीही नाही, उलट पाकिस्तानने नेहमीच आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून भारताला त्रास द्यायचे काम केले. बलवान तरुणाने अर्धवट समज असलेल्या दुर्बलाकडे समजदारीने दुर्लक्ष करावे, असेच भारताचे वागणे असते. 'नादान है, बच्चा है' अशी साधारण भूमिका. पण, पाकिस्तानची तरीही पिरपिर सुरूच. त्यामुळे २०१४च्या सत्तातरानंतर आलेल्या भारतीय सरकारने पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. कारण, नादान, नासमझ देशाच्या आड रक्तपिपासू आणि दहशतवादी राक्षसी वृत्ती आहे, हे या सरकारने जाणले. तसे १९७१ सालीही या देशाला त्याची खरी औकात कळलीच होती. तरी 'वेड घेऊन पेडगावला जायचे,' असे या देशाचे वागणे संपले नाही. स्वतःच्या देशात खायचे वांधे असताना या देशाचा भारताच्या काश्मीरवर डोळा. पण, हा डोळा माशाचा डोळा समजून भारतीय सैन्य आणि सध्याचे भारतीय सरकार अर्जुनाची भूमिका घेऊन आहे. त्यामुळे या देशाला पळता भुई थोडी झाली आहे. मग काय उठसूठ पाकिस्तानचे पंतप्रधान भारताची निंदा करतात आणि रडतात बस्स...

 

असो, नुकतेच लंडनमध्ये पाकिस्तानच्या रेल्वेमंत्र्यावर शेख रशीदवरच हल्ला झाला. कसला हल्ला? परमाणूचा, बॉम्बचा, बंदुकीचा की आणखी कसला घातक हल्ला... नाही नाही, तर शेख रशीद यांच्यावर हल्ला झाला तो अंड्यांचा आणि थोड्याफार फाईटींचा... हल्ला करणाऱ्यांचे म्हणणे होते की, शेख रशीदसारख्या माणसावर यापेक्षा आणखी सभ्यतेने हल्ला होऊच शकत नव्हता. आता कुणाला वाटेल की, हल्ला कुणी केला असावा? भारतीयांनी केला असावा, कारण रशीद यांनी भारतावर परमाणू हल्ला करण्याची धमकी दिली होती. तू आहेस कुठे? बोलतोस काय? वगैरे वगैरे उपहासात्मक शब्द रशीदबाबत मनात येतात, तर अशा या रशीदवर अंडे फेकणारे भारतीय किंवा भारत समर्थक नव्हते, तर ते होते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे लोक. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांचे फ्रान्समध्ये जोरदार स्वागत झाले, त्यात मुस्लीम कुटुंबीयही होते. यावर पाकिस्तानचे मंत्री फवाद खानचे म्हणणे की, "मुस्लीम मोदींचे स्वागत करूच शकत नाहीत. त्या मुस्लिमांना पैसे दिले असतील." मग हा ड्रामा झाला. फवाद याला पैसे आठवले, कारण ज्याच्याकडे जे नाही तेच आठवते. सगळ्यांनी ते बोलूनही दाखवले. कारण, जगाच्या पाठीवर 'भिकीस्तान' म्हणून ओळख असलेल्या देशाचे हे मंत्री. 'भिकारी' शब्द गुगलवर टाकला तर यांच्या 'वजिर-ए- आझम'चा चेहरा तत्काळ प्रकट होतो. त्यामुळे यांना पैसेच दिसणार. शेवटी काय? चोराच्या मनात चांदणे आणि भिकाऱ्याच्या मनात पैसा..

@@AUTHORINFO_V1@@