एअर इंडियाचे 'टेक ऑफ' अडचणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Aug-2019
Total Views |


एअर इंडियाच्या सहा विमानतळाचा इंधनपुरवठा तेलकंपन्यांनी रोखला


नवी दिल्ली : थकीत रक्कम ना चुकविल्याच्या कारणावरून एअर इंडियाच्या पुण्यासह सहा विमानतळावरील इंधनपुरवठा रोखण्यात आला आहे. इंडियन ऑइल या तेल कंपनीसह अन्य सर्वच तेल कंपन्यांनी हा पुरवठा बंद केल्याचे समजते. यामुळे एअर इंडियाच्या वाहतुकीवर अजूनतरी कोणताही परिणाम झाला नसल्याचे एअर इंडिया कडून कळते.

 

 
कोची, पुणे, पाटणा, रांची, विशाखापट्टणम आणि मोहाली या विमानतळांवरून एअर इंडियाल होणारा इंधन पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता अतिरिक्त इंधन साठ्यातून इंधन भरून याठिकाणच्या विमानांना प्रवास करावा लागणार आहे. यामुळे प्रवाशांची संख्या कमी करून अतिरिक्त इंधन घेऊन हि विमाने प्रवास करतील. एअर इंडियावर मोठे कर्ज असल्याने सध्या कंपनी हि देणी फेडू शकत नसल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्यानॆ संगितले. या कर्जातून बाहेर पाडण्यासाठी कंपनीला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. हि मदत केंद्राकडून मिळावी अन्यथा कंपनीचे खाजगीकरण करावे असे दोनच पर्याय शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले. एअर इंडियाने आत्तापर्यंत ६० कोटींचे कर्ज चुकवले आहे. या आर्थिक वर्षात कंपनीने चांगली आर्थिक कामगिरी केली असून, भविष्यात चांगला नफा कमवू असेही सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@