'श्रावण क्वीन डोंबिवली' : 'ती'च्याकडून 'ती'च्यासाठीचे सर्वात मोठे व्यासपीठ

    दिनांक  22-Aug-2019 07:47:02
२५ ऑगस्ट रोजी डोंबिवलीत पहिल्यांदाच कार्यक्रम


मुंबई : 'अनाहत इव्हेंट्स' प्रस्तूत आणि 'हर-हायनेस्ट' प्रायोजित डोंबिवली शहरात प्रथमच महिलांच्या सन्मानासाठी 'श्रावण क्वीन डोंबिवली' या शहरातील सर्वात मोठ्या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्याचे आयोजन रविवार, दि. २५ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता कुडाळदेशकर भवन डोंबिवली येथे करण्यात करण्यात आले आहे. डोंबिवली, मुंबई, ठाणे आणि नजीकच्या शहरात राहणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांना त्यांचे हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कतृत्वाचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

राज्यमंत्री व रायगड व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच हरहायनेस्टच्या संस्थापक आणि संचालक प्रज्ञा पोंक्षे, मेकअप, हेअर स्टाईल इनफिनिटी एज्युकेशनच्या तृप्ती राऊळ, दिग्दर्शक सुदेश म्हशीलकर, अभिनेता विकास महाजनी, क्य़ुरासीटी मिडीयाचे हेमेंद्र कुलकर्णी आणि अमेय परुळेकर, दिग्दर्शक संदीप सुर्वे, एस ए इनामदारच्या संचालक श्वेता इनामदार, तन्वी कॅटरर्सचे अशोक शेणवी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. १६ ते ३० म्हणजेच 'डायमंड' आणि ३० ते ६० 'गोल्ड', अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने होईल.

स्पर्धेच्या सुरुवातीला दोन्ही गटांतून येणारे स्पर्धक पारंपारिक वेषभूषा करतील, यावेळी स्वतःची ओळख आणि इतर माहिती परिक्षकांसमोर स्पर्धक देतील. दुसऱ्या फेरी प्रश्नोत्तरांची असून त्याद्वारे मिळालेल्या गुणांकनाच्या आधारे 'डोंबिवली श्रावण क्विन' घोषित करण्यात येणार आहे. यावेळी एकलव्य आर्ट फाऊंडेशनच्या सुनीला पोतदार यांचा विशेष कथ्थक नृत्याविष्कार सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आकाशवाणीवरील प्रसिद्ध निवेदक नरेंद्र बेडेकर करतील. या कार्यक्रमाचे प्रिंटींग पार्टनर मार्केट प्लस तसेच फूड पार्टनर सखी एंटरप्रायझेस चित्रा खंबाटे आणि स्मिता शिलेवंद आहेत.

स्पर्धकांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या एकूण ४० स्पर्धकांना ग्रूमिंग सेशन देण्यासाठी शुक्रवार, दि. २३ ऑगस्ट रोजी योग अभ्यासक वैभव कांबळी 'योगासने आणि सौदर्य' या विषयावर मार्दर्शन करतील. सायंकाळी ५ वाजता आंतरराष्ट्रीय किर्तीच्या झुंबा ट्रेनर दिशा भोर या व्यासपीठावरील वावर (कोरिओग्राफी) आणि अन्य गोष्टींची माहिती देतील. शनिवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मिसेस एशिया पॅसिफीक स्वीटी गोसावी 'पोश्चर, जेश्चर एण्ड अॅटीट्युट' या विषयावर मार्गदर्शन करतील. तर, दुपारी २ ते ४ या वेळेत आंतरराष्ट्रीय मेकअप आर्टीस्ट क्षमा धुमाळ मेकअप आणि तयारीबद्दल स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत.