राज ठाकरे ईडी चौकशी : मनसे नेते संदीप देशपांडे ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Aug-2019
Total Views |


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर पोलीसांनीही मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. गुरुवारी राज ठाकरे ईडीसमोर हजर होणार आहेत. मनसे कार्यकत्यांकडून कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी धरपडक सुरू करण्यात येत आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना सकाळी ताब्यात घेण्यात आले आहे. कोहीनूर सीटीएनएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी'आयएल एण्ड एफएस'तर्फे ४५० कोटींची गुंतवणूक व कर्जासंदर्भातील अनियमितता यांच्या चौकशीसाठी राज ठाकरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

 

या पार्श्वभूमीवर मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांना कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीशीअंतर्गत कायदेव्यवस्था भंग करणाऱ्या सर्व मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले जाणार आहे. संदीप देशपांडे यांना याच कारणासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, नाशिक आणि पिंपरी चिंचवड भागातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

 
 
@@AUTHORINFO_V1@@