अक्षय कुमार सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड अभिनेता

22 Aug 2019 16:18:15


 

 
मुंबई :'फोर्ब्स'ने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अक्षय कुमारचे नाव चौथ्या स्थानावर आहे. या यादीमध्ये चौथ्या स्थानी असणारा अक्षय बॉलिवूडचा एकमेव अभिनेता ठरला आहे. 'फोर्ब्स'ने जाहीर केलेल्या यादीनुसार, १ जून २०१८ ते १ जून २०१९ या काळात अक्षयची अंदाजे कमाई जवळपास ६५ मिलियन डॉलर म्हणजेच ४६५ कोटी इतकी आहे. या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीमध्ये अक्षय कुमारव्यतिरिक्त इतर कोणत्याही बॉलीवूड अभिनेत्याचा समावेश नाही.

 

 
फोर्ब्सने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली असून, या यादीत हॉलिवूड स्टार ड्वेन जॉनसन पहिल्या स्थानावर आहे. रेसलिंगमध्ये द रॉक नावाने प्रसिध्द झाल्यानंतर अभिनेता बनलेल्या ड्वेन जॉनसने जुमांझीआणि फास्ट अँन्ड फ्युरियसया सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ड्वेन जॉनसनंतर या यादीत एवेंजर्स एंडगेम स्टार्स क्रिस हेमस्वर्थ आणि रॉबर्ट डाउनी जुनियर यांचा देखील समावेश आहे. फोर्ब्सनुसार, क्रिस हेमस्वर्थची कमाई . ४ मिलियन डॉलर आणि रॉबर्टची कमाई ६६ मिलियन डॉलर आहे. या टॉप-१0 मध्ये ब्रँडली कूपर, क्रिस इवांस आणि पॉल रूड यांचाही समावेश आहे. ब्रँडली कूपरने अ स्टार इज बॉर्नया चित्रपटातून ४0 मिलियन डॉलरची कमाई केली.. अक्षयनंतर जॅकी चैन ५८ मिलियन डॉलर म्हणजे ४१५ कोटींच्या कमाईसह ५व्या क्रमांकावर आहे.

 

 
गेल्या वर्षी म्हणजेच २०१८ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० अभिनेत्यांच्या यादीमध्ये अक्षयसोबत सलमान खानचाही समावेश होता. गेल्या वर्षी या यादीमध्ये अक्षय कुमार ७व्या क्रमांकावर तर सलमान खान ९व्या क्रमांकावर होता.
Powered By Sangraha 9.0