भारतीयांमध्ये क्रिकेटपेक्षा 'मातीतला खेळ' सरस...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Aug-2019
Total Views |


 


नवी दिल्ली : सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. येत्या गुरुवारपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी सामान्यांना सुरुवात होणार आहे. परंतु, भारतीय प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. बीएआरसीच्या सर्वेक्षणानुसार प्रेक्षकांनी प्रो-कबड्डीच्या सातव्या पर्वाला जास्त पसंती दर्शवली आहे. त्यामुळे भारतीय प्रेक्षक मातीतल्या खेळाकडे पुन्हा एकदा आकर्षित होऊ लागल्याचे चित्र दिसून येत आहे.

 

टी.व्ही. वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजणाऱ्या 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल इंडिया' (बीएआरसी) या संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, प्रो-कबड्डीचे सामने पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या ही भारत विरुद्ध विंडीज मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकसंख्येच्या अधिक आहे. ऑगस्ट ३ ते ९ या कालावधीतली आकडेवारी बीएआरसीने जाहीर केली आहे. सर्वाधिक प्रेक्षकसंख्या मिळवणाऱ्या क्रीडा वाहिन्यांच्या यादीत 'सोनी टेन ३' वाहिनीने थोड्या अंतराने पहिले स्थान पटकावले. मात्र प्रो-कबड्डी सामन्यांचे प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीनेही आपला प्रेक्षकवर्ग कायम राखला आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही वाहिन्यांमधली स्पर्धा चुरशीची होणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@